फलटण – लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त फलटण जयंती उत्सव समितीच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात कोरोनाच्या संसर्गामुळे साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली.यावेळी १० वी,१२ वी च्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नगरसेवक सचिन अहिवळे,दत्ता अहिवळे सर,सचिन घोलप,शक्ती भोसले,जयंती मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घोलप,दयानंद पडकर आदि मान्यवर उपस्थित होते.
फलटण येथे अण्णाभाऊ साठे जयंती साध्या पध्दतीने साजरी
यावेळी सर्व प्रथम अण्णाभाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन करुन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी बोलताना विजय भोंडवे म्हणाले की,अण्णाभाऊंचे कार्य संबध देशाला माहित आहे.तरीही आपला समाज अजुन शिक्षणापासुन वंचित आहे.आपल्या समाजाला खर्या अर्थाने शिक्षण घेऊन उच्च पदावर गेले पाहिजेत असा मानस ठेवणे गरजेचे आहे.या वर्षी अण्णाभाऊंचे जन्मशताब्दी वर्ष असुन यावर्षी संपुर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार होते.परंतु या कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण देशावर संकट असल्यामुळे संबंध मातंग समाजाने हे जन्मशताब्दी वर्ष साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार विजय भोंडवे यांनी मानले.
यावेळी सोमनाथ घोलप,विक्रम घोलप,इंदुताई घोलप,रोहित इंगळे,शाहु घोलप,अजय घोलप,बेबीताई इंगळे आदि उपस्थित होते.