
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि.२८ जून २०२५):- फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन गुरुवार दिनांक २६ जून रोजी करण्यात आले होते

यावेळी प्रमुख उपस्थिती प्रशालेचे प्राचार्य श्री वसंतराव शेडगे , उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने उपस्थित होते यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पालखीचे प्रस्थान करून सोहळ्याचा शुभारंभ केला .

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ( दिंडी) सोहळा मुधोजी हायस्कूल येथून महात्मा फुले चौक, गजानन चौक , श्री राम मंदिर, उमाजी नाईक चौक मार्गे पालखी सोहळा पुनः मुधोजी हायस्कूल या ठिकाणी दाखल झाला व पालखीची सांगता करण्यात आली .
या दिंडीमध्ये माध्यमिक विभागातील इयत्ता पाचवी ते सातवी मधील सर्व विद्यार्थी तसेच उच्च माध्यमिक विभागातील इयत्ता १२ वी मधील वाणिज्य , विज्ञान आणि कला वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या भक्ती भावे टाळ आणि मृदंग वाजवत नृत्य सादर केले व विठू माऊलीच्या नामघोषात परिसर भक्तीमय करून टाकला. तसेच प्रशालेतील शिक्षकवृंद यांनी सुद्धा दिंडी सोहळ्यात अभंग, माऊलीचा गजर, फुगड्या खेळण्याचा आनंद घेतला सगळे विद्यार्थी हे सुद्धा पांडुरंगाच्या भजनात तल्लीन झाले होते अश्या या भक्तीमय वातावरणात पालखी सोहळा साजरा केला.

अशाप्रकारे विद्यार्थ्यांना भागवत धर्म व वारकरी संप्रदायाची शिकवण आणि चांगले ज्ञानरूपी संस्कार कसे जोपासले जातात याची शिकवण या उपक्रमांमधून मिळाली