आरोग्य किशोरीचे हित घराचे – डॉ. हिमगौरी वडगांवकर

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २८ जून २०२५):- येथील रागिनी फाऊंडेशनच्या माध्यमातून 8 मार्च जागतिक महिलादिन व 10 मार्च क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वंजारवाडी येथे स्मार्ट गर्ल अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आरोग्य किशोरीचे..हित घराचे या ओळीला अनुसरून डॉ. वडगावकर यांनी मुलींना किशोर अवस्थेबद्दल महत्त्वाचे मार्गदर्शन केले.किशोरावस्थेपूर्वी मुलींना मानसिक, शारीरिक व सामाजिक आरोग्य याबद्दल चे मार्गदर्शन करण्यात आले.’मुलींनी न घाबरता प्रत्येक प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे, आपल्या मनात असलेल्या समस्या व प्रश्न याबाबत पालकांसोबत शिक्षकांसोबत मोकळेपणाने संवाद साधल्यास आपले मानसिक आरोग्य देखील चांगले राहू शकते.असेही त्या म्हणाल्या. शाळा व विद्यालय पासूनच मुलींना आरोग्य, कायदे, स्व-सुरक्षिता याबद्दलचे ज्ञान दिल्यास त्याचे जीवन अधिक सजग होईल. याउद्देशाने ‘स्मार्ट गर्ल’ अभियान अंतर्गत वेगवेगळ्या सत्रांचे आयोजन केले जात असल्याची माहिती रागिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी दिली.
यावेळी रागिनी फाऊंडेशनच्या वतीने मुख्याध्यापिका सुरेखा भालेराव, पुष्पा खोमणे,
वनिता भुतकर,संगीता शिंदे, वैशाली अशोक कांबळे.,ताई ढोले या शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापिका सुरेखा भालेराव यांनी केले तर सूत्रसंचालन वनिता भूतकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रागिनी फाऊंडेशन च्या सर्व सभासद मंडळाचे सहकार्य लाभले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!