मोटार वाहन कर अधिनियमात सुधारणा


फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि.१ जुलै २०२५) : महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण पत्र भाग 4 मधील असाधारण क्र.21 नुसार मोटार वाहन कर अधिनियमात सुधारणा करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी 1 जुलै 2025 पासून करण्यात येणार असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी दिली आहे.
सीएनजी व एलपीजीवर चालणारी दुचाकी व चारचाकी वाहने 10 लाखापर्यंत 8 टक्के व 10 लाख ते 20 लाखापर्यंत 9 टक्के आणि 20 लाखावरील वाहनांकरिता 10 टक्के, बॅटरीवर चालणारे मोटार वाहनाची किंमत 30 लाखापेक्षा अधिक असल्यास किंमतीच्या 6 टक्के, क्रेन्स, क्रॉम्पेसर्स, प्राजेक्टर्स किंवा खनिजे यासारखी बांधकामाकरिता वापली जाणारी कोणतेही मोटार वाहने नवीन धोरणानुसार वाहनांच्या किंमतीच्या 7 टक्के, ओझे लादलेले असताना, ज्याचे नोंदणीकृत वजन 7500 किलो ग्रॅमपेक्षा अधिक नसेल अशी माल किंवा सामग्री यांची वाहतुककरिता वापरली जाणारी मालवाहू वाहने नवीन धारेणानुसार वाहनाच्या किंमतीच्या 7 टक्के अशी नवीन कर रचना असणार आहे, असेही श्री. म्हेत्रे यांनी कळविले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!