
संग्रहित छायाचित्र
फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि.१ जुलै २०२५):- सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक-इबीसी-२००३/प्र.क्र.३०१/मावक-२ दिनांक-१ नोव्हेंबर, २००३ अन्वये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसूल करू नये, तसे आढळल्यास संबंधित महाविद्यालय विरोधात फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयांना याबाबत वेळोवेळी सूचित करण्यात आले आहे. तरीही काही महाविद्यालयांकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेल्या व शिष्यवृत्तीकरीता पात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून फी वसूलीबाबत कोणत्याही तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित महाविद्यालय विरोधात फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशा सूचना सातारचे समाज कल्याण सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.