१०० पैकी ९७ गुण मिळवत पटकाविले रोख पारितोषिक

भारती विद्यापीठ इंग्रजी बाह्य परीक्षेमध्ये मुधोजी हायस्कूल मधील चि.समर्थ सागर जाधव याचा महाराष्ट्र राज्यामध्ये तृतीय क्रमांक आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना प्राचार्य श्री.वसंत शेडगे, उपप्राचार्य श्री.सोमनाथ माने ,पर्यवेक्षिका सौ.पूजा पाटील,अमोल सपाटे ,सचिन धुमाळ,सोहनी गुंजवटे-सस्ते ,संगीता कदम ,मुक्ता शिंदे व तुषार भोसले
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ३ जुलै २०२५):-
भारती विद्यापीठा अंतर्गत दिनाक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे घेण्यात आलेल्या इंग्रजी बहिःस्थ (इंग्रजी – एन्ट्रन्स् )परीक्षेत फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधील इयत्ता सातवीत शिकणारा विद्यार्थी चि. समर्थ सागर जाधव याने इयत्ता ७ वी इंग्रजी – एन्ट्रन्स् परीक्षेत १०० पैकी ९७ गुण प्राप्त करून राज्यामध्ये तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्याला रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.
या परीक्षेसाठी विद्यालयातील इयत्ता सातवी चे ९२ विद्यार्थी बसले होते यापैकी ६४ विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता प्राप्त केली तर ११ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे.
वरील सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी – एन्ट्रन्स् परीक्षेसाठी विद्यालयातील इंग्रजी विषय शिक्षक श्री अमोल सपाटे , श्री सचिन धुमाळ , सौ. सोहनी गुंजवटे – सस्ते, कु संगीता कदम, श्रीमती मुक्ता शिंदे व कु सुषमा घोरपडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
चि. समर्थ सागर जाधव च्या यशाबद्दल त्याचे व त्याला मार्गदर्शन करणारे विषय शिक्षकांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,फलटण- कोरेगाव विधानसभेचे माजी आमदारमा मा. श्री दीपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदे चे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र खो- खो असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एजुकेशन सोसायटी च्या नियामक मंडळाचे सदस्य, प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम, तपासणी अधिकारी श्री दिलीप राजगुडा, सहाय्यक तपासणी अधिकारी श्री सुधीर अहिवळे,प्रशालेचे प्राचार्य श्री वसंतराव शेडगे , ज्युनियर कॉलेज चे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने, माध्यमिक विभाग पर्यवेक्षिका सौ पूजा पाटील ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी अभिनंदन