भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत गणित बहिःस्थ परीक्षेत मुधोजी हायस्कूलचा सुयश दोशी राज्यात पहिला .

१०० पैकी १०० गुण मिळवत पटकाविले रोख पारितोषिक

भारती विद्यापीठ, पुणे गणित बाह्य परीक्षेमध्ये मुधोजी हायस्कूलचा चि. सुयश दोशी हा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना प्राचार्य श्री. वसंत शेडगे , उपप्राचार्य श्री. सोमनाथ माने ,पर्यवेक्षिका सौ. पूजा पाटील ,सौ. लतिका अनपट ,राजेंद्र गोडसे , आदित्य केदार , तृप्ती शिंदे ,वैशाली रसाळ , शुभदा आगवणे व शीतल दोशी

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ३ जुलै २०२५):-भारती विद्यापीठा अंतर्गत दिनाक १० फेब्रुवारी २०२५ रोजी मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे घेण्यात आलेल्या गणित बहिःस्थ परीक्षेत फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधील इयत्ता सहावीत शिकणारा विद्यार्थी चि. सुयश शितल दोशी याने इयत्ता ६ वी गणित बहिःस्थ परीक्षेत १०० पैकी १०० गुण प्राप्त करून राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्याला रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.

या परीक्षेसाठी विद्यालयातील इयत्ता पाचवी , सहावी व सातवी चे मिळून एकूण १३१ विद्यार्थी बसले होते यापैकी ५८ विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता प्राप्त केली तर २३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे.

वरील सर्व विद्यार्थ्यांना गणित बहिःस्थ परीक्षेसाठी विद्यालयातील गणित विषय शिक्षक श्री राजेंद्र गोडसे , श्री आदित्य केदार , कु. तृप्ती शिंदे , सौ. वैशाली रसाळ , सौ. शुभदा आगवणे व कु. पूजा खवळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

चि. सुयश शीतल दोशी च्या यशाबद्दल त्याचे व त्याला मार्गदर्शन करणारे विषय शिक्षकांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,फलटण- कोरेगाव विधानसभेचे माजी आमदारमा मा. श्री दीपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदे चे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र खो- खो असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एजुकेशन सोसायटी च्या नियामक मंडळाचे सदस्य, प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम, तपासणी अधिकारी श्री दिलीप राजगुडा, सहाय्यक तपासणी अधिकारी श्री सुधीर अहिवळे,प्रशालेचे प्राचार्य श्री वसंतराव शेडगे , ज्युनियर कॉलेज चे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने, माध्यमिक विभाग पर्यवेक्षिका सौ पूजा पाटील ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी अभिनंदन

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!