मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे आरोग्य शिबिर संपन्न…

आहार, योग आणि ध्यान या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ सौ निलिमा दाते ,डॉ.अलका पोळ, सौ जयश्री उपाध्याय ,सौ वैनिता लोणकर व संदीप पवार इत्यादी मान्यावर

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ०६ जुलै २०२५):-
फलटण एजुकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे शनिवार दिनांक ५ जुलै २०२५ रोजी सकाळ सत्रात चित्रकला सभाग्रह येथे आहार, योग आणि ध्यान या विषयावर आरोग्य शिबिर तथा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी प्रशालेचे प्राचार्य श्री वसंतराव कृष्णा शेडगे होते तर तज्ञ मार्गदर्शिका म्हणून डॉ.अलका पोळ, डॉ.नीलिमा दाते, सौ जयश्री उपाध्याय व उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रशालेचे प्राचार्य श्री वसंतराव शेडगे म्हणाले की विद्यार्थ्यांना सात्विक आहारामुळे विचार व बुद्धी सात्विक बनते. त्यामुळे आरोग्य चांगले राहते ,रोगप्रतिकारक शक्ती वाढते योगा मुळे आरोग्य सुधारते व तणावमुक्त राहण्यास मदत होते याबद्दल मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी तज्ञ मार्गदर्शिका डॉ. नीलिमा दाते यांनी योगा बद्दल मार्गदर्शन केले. डॉ. अलका पोळ यांनी विद्यार्थ्यांना योग व ध्यानामुळे विविध प्रकारचे फायदे होतात .व ताण-तणाव दूर होतो .याची वर्गात प्रात्यक्षिक करून घेतले. तर उपाध्याय मॅडम यांनी आहार बद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास इयत्ता ११ वी मधील कला , वाणिज्य व विज्ञान शाखेतील सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचा लाभ घेतला
या कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशाळेतील आरोग्य विभाग समिती व शिक्षक व शिक्षिका वृंद यांनी विशेष प्रयत्न केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ विनिता लोणकर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री संदीप पवार यांनी केले आणि आभार प्रदर्शन सौ रणवरे मॅडम यांनी केले..

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!