भारताच्या प्रगतीत अभियंत्यांचे योगदान म्हतपूर्ण:डॉ. दिनेश हंचाटे

डॉ. दिनेश शालन भगवान हंचाटे, प्राध्यापक, संगणक अभियांत्रिकी दत्तकला अभियांत्रिकी विद्याशाखा, स्वामी चिंचोली, पुणे.

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ०७ जुलै २०२५):-
अभियंता म्हणजे वैज्ञानिक आणि तांत्रिक ज्ञानाचा वापर करून मानवी जीवनातील समस्या सोडवणारा, नवनवीन तंत्रज्ञान, यंत्रणा, पायाभूत सुविधा आणि उद्योग विकसित करणारा व्यक्ती. अभियंते विविध क्षेत्रात कार्यरत असतात – सिव्हिल, यांत्रिक, इलेक्ट्रिकल, संगणक, केमिकल, आदी म्हणून भारताच्या प्रगतीत अभियंत्यांची भूमिका म्हतपूर्ण आसल्याचे प्रतिपादन डॉ. दिनेश शालन भगवान हंचाटे, यांनी केले.
बारामती दौंड येथील विविध क्षेत्रातील अभियंता यांचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी बारामती व दौंड तालुक्यातील विविध क्षेत्रातील अनेक अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभियंते हे देशाच्या प्रगतीचे कणा आहेत. त्यांनी पायाभूत सुविधा, उद्योग, तंत्रज्ञान, ऊर्जा, वाहतूक, जलसंपदा, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
भारतातील प्राचीन अभियंते – सिंधू संस्कृतीतील शहरांचे नियोजन, दक्षिण भारतातील मंदिरे, गुजरातचे विहिरी, राजस्थानमधील किल्ले – हे सर्व त्या काळातील अभियंत्यांच्या कौशल्याचे उदाहरण आहेत.
आधुनिक भारताच्या विकासात अभियंत्यांनी मोठी भूमिका बजावली. रस्ते, पूल, धरणे, वीज प्रकल्प, मेट्रो, विमानतळ, औद्योगिक वसाहती, माहिती तंत्रज्ञान पार्क्स, स्मार्ट सिटी, हे सर्व अभियंत्यांच्या कल्पकतेमुळे शक्य झाले आहे.

सर एम. विश्वेश्वरय्या यांचे योगदान
सर एम. विश्वेश्वरय्या हे भारतातील सर्वात महान अभियंत्यांपैकी एक मानले जातात. त्यांनी कृष्णराज सागर धरण, सिंचन व पूरनियंत्रण प्रकल्प, मुंबईच्या बंदरातील ड्रेनेज सिस्टम, अशा अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची रचना केली.
त्यांनी तंत्रशिक्षणाचा प्रसार केला आणि औद्योगिक विकासाला गती दिली. त्यांच्या कार्यामुळे भारतीय अभियंत्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली.
महिला अभियंत्यांचे योगदान
भारतातील महिला अभियंत्यांनीही समाजातील अडथळ्यांवर मात करून अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ए. ललिता, लिलाम्मा जॉर्ज कोशी, पी. के. थ्रेशिया, राजेश्वरी चॅटर्जी या महिलांनी केवळ तांत्रिक योगदानच दिले नाही, तर इतर महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
अभियंत्यांचा समाजावर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम
अभियंते केवळ पायाभूत सुविधा किंवा उद्योग निर्माण करत नाहीत, तर त्यांनी केलेल्या नवकल्पना आणि तांत्रिक सुधारणा यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळते, रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि नागरिकांचे जीवनमान उंचावते.शाश्वत विकास, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया यांसारख्या उपक्रमांमध्ये अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
नवीन पिढीसाठी प्रेरणा
अभियंता दिवस (१५ सप्टेंबर) हा केवळ सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ नसून, देशाच्या प्रगतीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सर्व अभियंत्यांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. हा दिवस विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये करिअर करण्यासाठी प्रेरित करतो.
भारतातील अभियंते हे देशाच्या प्रगतीचे खरे शिल्पकार आहेत. त्यांनी पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, औद्योगिक विकास, आणि समाजातील जीवनमान उंचावण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या कल्पकतेमुळे आणि मेहनतीमुळेच भारत आज जागतिक स्तरावर वेगाने प्रगती करत आहे
या प्रसंगी प्रा. डॉ हांचाटे यांच्या हस्ते विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा ही सन्मान करण्यात आला.

आभार प्रा. मनोज शिंदे यांनी मानले


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!