

व्यासपीठावरू अध्यक्षीय भाषण करताना मा श्री वसंतराव शेडगे व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १२ जुलै २०२५):-
फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून प्रशालेत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे प्राचार्य श्री वसंतराव शेडगे होते यावेळी बोलताना ते म्हणाले की कुटुंबातील गुरु हे आई-वडील असतात व शाळेमधील गुरु हे शिक्षक असतात व तेच आपल्यावर चांगली संस्कार घडवीत असतात. गुरु पौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या गुरू प्रति आदर ठेवून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चालले पाहिजे गुरु श्रद्धास्थानी मानून आपण त्यांच्या विचारांचे व आचाराचे पालन केले पाहिजे असे मनोगत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ शुभांगी बाबर , पर्यवेक्षक श्री राजेंद्र नाळे उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने ,विद्यार्थी व शिक्षक हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ धनश्री नाईक निंबाळकर व सौ वनिता लोणकर यांनी केली तर आभार सौ नीलिमा कुमठेकर यांनी मानले .