बारामती डिझाइन क्षेत्रातील आय. आय. टी. प्रवेशधारक

श्रद्धा शितोळे हिचा सन्मान करताना मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १२ जुलै २०२५):-
सर्व सामान्य परिस्थिती असताना अभ्यास , जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास या गुणांच्या जोरावर बारामतीच्या श्रद्धा स्नेहल नवनाथ शितोळे हिने आयआयटी गुवाहटी येथे बॅचलर ऑफ डिझाईन या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश मिळवला आहे हे कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन विद्या प्रतिष्ठानचे प्रा. श्रीराम गडकर यांनी सांगितले.
बारामती येथील वास्तु व अंक शास्त्र तज्ञ नवनाथ शितोळे यांची कन्या श्रद्धा हिने केंद्र शासनाच्या युसीड परीक्षेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटक ( ई डब्ल्यू एस) प्रवर्गा मधून देशात ७ वा क्रमांक मिळवला व आय. आय. टी . गुवाहटी येथे डिझाइन विषयात प्रवेश मिळवला आहे.
या बदल कौतुक मेळावा (शनिवार दि.१२ जुलै ) चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रा.श्रीराम गडकर बोलत होते.
या प्रसंगी ओम साई लॉन्स चे संचालक अजित तावरे,चित्रकला शिक्षिका सौ. जुगणु चौधरी,सौ. दिपाली महामुनी, पंचायत समिती बारामतीचे मा. सदस्य राहुल भापकर, सोमेश्वर कारखान्याच्या मा. उपाध्यक्षा सौ. प्रणिता खोमणे , रायगाव साखर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक सुग्रीव निंबाळकर,विजयराव जगताप,सचिन निंबाळकर,सतीश जगताप, निलेश वाघ, रमेश निंबाळकर,मेघराज शिंदे ,संदीप यादव व इतर मान्यवर उपस्थित होते.
सामान्य कुटूंबातील मुले सुद्धा गुणवत्तेच्या जोरावर यश मिळवू शकतात हे श्रद्धा ने दाखविले असल्याचे उद्योजक अजित तावरे यांनी सांगितले
आई वडिलांचा पाठींबा व शिक्षकांच्या मार्गदर्शना मुळे सदर यश मिळाले असून डिझाइन क्षेत्रात जगात बारामती चे नाव उज्वल करू असे सत्काराला उत्तर देताना श्रद्धा शितोळे यांनी सांगितले.
प्रास्ताविक नवनाथ शितोळे यांनी केले सूत्रसंचालन श्री अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार राहुल शितोळे यांनी मानले.