
बारामती प्रशासकीय भवन येथे निवेदन देत असताना होमिओपॅथिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १२ जुलै २०२५):-
विधिमंडळांनी मार्च २०१४ मध्ये जनहितार्थ पारित केलेल्या व राज्यपालांच्या सहीने अमलात आलेल्या अधिनियमाच्या अंमलबजावणीत अडथळे आणणाऱ्या संघटनेच्या दबावाला राजकारणाला न जुमानता कारवाई होणे बाबत बारामती प्रांत कार्यालय व तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष डॉ अमोल जगताप सचिव डॉ सचिन लोणकर खजिनदार डॉ अमित भापकर यांच्यासहित संघटनेचे सर्व पदाधिकारी व बारामती तालुक्यातील होमिओपॅथिक संघटनेचे सदस्य डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातील तळागाळातील जनतेसह प्रत्येक घटकाला प्रभावी आरोग्यसेवा प्राप्त व्हावी याकरिता विधिमंडळे मार्च २०१४ मध्ये पारित केलेल्या आधी नियमाने राज्यातील नोंदणीकृत वैद्यकीय होमिओपॅथिक वैद्यकीय व्यवसायाकरिता शासनमान्य एक वर्षाचा आधुनिक चिकित्सा आवश्यक शास्त्र अभ्यासक्रम महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या द्वारे राज्यातील शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात चालविला जातो.
हा अभ्यासक्रम उत्तीर्ण होऊन हजारो नोंदणीकृत होमिओपॅथिक डॉक्टर्स रुग्ण सेवा करीत आहेत आधी नेय मानवे या डॉक्टरांची स्वतंत्र नोंदवहीत नोंद करणे महाराष्ट्र वैद्यक परिषदेस अनिवार्य आहे अनेक वर्षांच्या कालखंडात विधी व न्याय विभागाच्या अधिप्रायानुसार महाराष्ट्र वैद्यक प्रसिद्धीने या तरतुदींची अंमलबजावणीची अधिसूचना जारी केलेली आहे राज्यातील आय एम ए सहकारी संघटना कोणत्या अभ्यास न करता असत्य अर्धसत्य माहिती प्रसारमाध्यमातून सर्वत्र प्रसारित करीत आहे व रुग्णांना वेटीस दणणाऱ्या आंदोलकांची भाषा करत आहे शासनावर दबाव टाकत आहेत या जन विरोधी प्रवृत्तींना शासनाने थारा देऊ नये
तसेच बारामती सर्व प्रगत तालुक्यातील ११८ गावा पाठीमागे फक्त नऊ एमबीबीएस डॉक्टर्स आहेत राहिलेल्या सर्व सेवा या ५३२ आयुष डॉक्टर्स दिवस रात्र सेवा पुरवित आहेत याची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांनी नोंद घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर निवेदन प्रांत व तहसील कार्यालयाच्या वतीने प्रतिनिधी यांनी स्वीकारले