फलटण तालुक्यातील शहरी विभागात तीन जागेवरती सर्व मुधोजी हायस्कूलचे स्कॉलरशिप धारक

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १२ जुलै २०२५):-
शैक्षणिक वर्ष २०२४/२५ मध्ये राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी मध्ये फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये एकूण तीन विद्यार्थिनीना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी बुधवार दि. ०९ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आली आहे.
तीन विद्यार्थ्यांपैकी कु. गोडसे स्वरा सुनील हिने ३०० पैकी २५८ गुण मिळवून फलटण तालुक्यातील शहरी विभागात प्रथम क्रमांक पटकावला . कु दोशी वैभवी विपुल ३०० पैकी २५४ गुणमिळवत शहरी विभागात दुसरा क्रमांक पटकावला ,कु. जाधव वेदिका संदीप ३०० पैकी २५२ गुण मिळवत शहरीविभागात तिसरा क्रमांक पटकावला विशेष बाब म्हणजे फलटण तालुक्यातील शहरी विभागात तीन जागा होत्या या तिन्ही जागेवर मुधोजी हायस्कूलचे स्कॉलरशिप धारक आहेत व ते शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत.वरील सर्व विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवून शाळेची गौरवशाली परंपरा कायम राखली.
वरील विद्यार्थ्यांनचे शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग घेतल्यामुळे व त्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या नियोजनबद्ध तयारीचा परिणाम विद्यार्थ्यांच्या यशात दिसून येतो
या विद्यार्थ्यांना श्री संतोष तोडकर ,श्री संजय गोफणे,श्री राजेंद्र गोडसे ,सौ.वैशाली रसाळ , सौ. सोहनी सस्ते, कु.तृप्ती शिंदे ,सौ.शुभदा आगवणे,सौ.अनुराधा नाईक निंबाळकर,श्री शंकर तडवी, श्री आदित्य केदार, सौ मुक्ता शिंदे, कु सुषमा घोरपडे,सौ. अश्विनी जाधव,सौ रझिया शेख, सौ.शितल अहिवळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल व त्याना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,माजी आमदार मा.श्री दीपकराव चव्हाण ,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोशिएशन चे अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,फलटण एजुकेशन सोसायटी च्या नियामक मंडळाचे सदस्य,प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम,तपासणी अधिकारी श्री दिलीप राजगुडा, सहायक तपासणी अधिकारी श्री सुधीर अहिवळे प्रशालेचे प्राचार्य श्री. वसंतराव शेडगे,उपप्राचार्य सौ शुभांगी बाबर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने,पर्यवेक्षक श्री. राजेंद्र नाळे ,श्री.रावसाहेब निंबाळकर, पर्यवक्षिका सौ. पूजा पाटील तसेच इतर शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.