
फलटण टुडे वृत्तसेवा( फलटण दि १३ जुलै २०२५):-:-
महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ फलटण यांच्या मार्फत मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण मधील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना फलटण परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख श्री वाघमोडे साहेब यांच्या हस्ते मुलींना मोफत पास वितरित करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री वाघमोडे साहेब म्हणाले की विद्यार्थिनींना प्रवास करताना कोणतीही अडचण आली तर माझ्याशी थेट संपर्क करा असे त्यांनी सांगितले व या मोफत योजनेचा सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन केले .

यावेळी परिवहन समितीचे ज्युनियर विभाग प्रमुख श्री ज्ञानेश्वर बोंद्रे, परिवहन समितीचे माध्यमिक विभागाचे प्रमुख श्री चेतन बोबडे ,समितीचे सदस्य श्री सुधाकर वाकुडकर, श्री राजेंद्र गोडसे ,श्री श्रीकांत तावरे ,श्री अनिकेत गायकवाड व ननवरे मॅडम, शिंदे मॅडम, चव्हाण मॅडम, टिळेकर मॅडम यांचे सहकार्य लाभले उपस्थित होते.
आभार श्री सुधाकर वाकुडकर यांनी मानले.