लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन,चा प्रथम वर्धापन दिन साजरा

सुमित उरकडकर यांचा सन्मान करताना प्रा. नामदेव लडकत सर व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १४ जुलै २०२५):-
आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर अभ्यासाला पर्याय नाही. हवे ते मिळवण्यासाठी ध्येय ठेवा, सातत्याने प्रयत्न करा. पालकांनी आपल्या मुलांना समजून घेतले पाहिजे आणि अनावश्यक लाड टाळावेत मोबाईल कामापूरता वापर करा ,मोबाईल शाप म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते सुमित उरकुडकर यांनी केले.
लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन, बारामतीचा प्रथम वर्धापन दिन प्रसंगी उरकुडकर विद्यार्थी पालक यांना मार्गदर्शन करत होते याप्रसंगी लटकन स्कूल ऑफ फाउंडेशनचे संचालक प्रा नामदेव लडकत, प्रा गणेश लडकत, जलसंपदा विभागाचे अभियंता चंद्रशेखर लडकत,
प्राचार्य रामचंद्र वाघ,खजिनदार दत्तात्रय लडकत,संचालिका शुभांगी नामदेव लडकत,संचालिका प्रियंका गणेश लडकत,संचालिका प्रियंका चंद्रशेखर लडकत,मा. सरपंच बाबासाहेब चौधर ,मा. मुख्याध्यापक मुकुंद एकतपुरे, पत्रकार प्रमोद ठोंबरे हरीदास शिंदे ,प्रवीण लोखंडे ,
चंद्रशेखर लडकत मा. न्यायाधीश वाबळे साहेब,अनिल लडकत
रंधावे अॅड महेश फरतरडे
,अॅड प्रशांत रूपनवर,उद्योजक महेश झगडे,सक्सेस कोड अकॅडमीचे संचालक ए.पी. भुजबळ व विराज येळे नीट परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेली सिद्धी बडे ,
आदी मान्यवर उपस्तीत होते.
जिद्द चिकाटी आत्मविश्वास गुण अंगी बाळगून विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे व आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा असा सल्ला पोलीस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड यांनी दिला.
प्रयत्न करत रहा यश मिळत जाईल गुणवत्ता आणि दर्जा देण्यासाठी कटिबद्ध कायमस्वरूपी राहणार असल्याचे प्रा नामदेव लडकत यांनी पालक व विद्यार्थी यांना ग्वाही दिली.
या प्रसंगी दहावी, बारावी व नीट,
जे ई ई ,सीईटी ,परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
–—————