
फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. १४ जुलै २०२५ (जिमाका))- निवडणूक २०२५ अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडील आदेश क्र जिपनि-२०२५/प्र.क्र.३६/पं.रा-२ दि १२/६/२०२५ अन्वये प्रभागाच्या भौगोलीक सिमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सदर आदेशात दिलेल्या सुचनेनुसार सातारा जिल्हा परिषद व ११ पंचायत समितीची प्रारुप प्रभागरचना दि १४ जुलै २०२५ रोजी प्रसिध्द करणेबाबत आदेशीत केले आहे.त्याअनुषंगाने सातारा जिल्हा परिषद निवडणुक विभाग व ११ पंचायत समिती निर्वाचक गणाची प्रारुप प्रभागरचना दि १४ जुलै २०२५ रोजी संबंधीत तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यालय सातारा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसामान्यांना पहावयास उपलब्ध केले आहे.तरी सदर प्रभागरचनेच्या मसुदयास आपल्या काही हरकत किंवा सुचना असल्यास त्यासंबंधीची सकारण लेखी निवेदने/हरकती/सुचना संबंधीत तहसिलदार यांचेकडे दि २१ जुलै २०२५ पर्यंत सादर करावेत. उपरोक्त तारखेनंतर तहसिलदार यांच्याकडे आलेली निवेदने/हरकती/सुचना विचारात घेतली जाणार नाहीत., असे उपजिल्हाधिकारी (महसूल)विक्रांत चव्हाण यांनी आवाहन केले आहे.