
मलबार गोल्ड च्या’ हंगर फ्री वर्ल्ड ‘ चा शुभारंभ करताना मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १४ जुलै २०२५):-
बारामती येथील मलबार गोल्ड अँड डायमंड यांच्या वतीने ‘भुकेलेल्यांना मोफत अन्न’ (हंगर फ्री वर्ल्ड)
या योजनेचा शुभारंभ सोमवार दिनांक १४ जुलै रोजी संपन्न झाला.
या प्रसंगी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी ऋषिकेश हंगे, मनसेचे राज्य उपाध्यक्ष ऍड सुधीर पाटसकर, राष्ट्रवादी प्रदेश कार्याध्यक्ष ऍड महेश दादा देवकाते,
बारामती शहर राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा अनिता गायकवाड, हृदय रोग तज्ञ डॉ रमेश भोईटे व निर्मला भोईटे, ऍड सुप्रिया बर्गे,साधना केकान, शुभांगी चौधर, हेमलता परकाळे, दर्शना जैन ,गीता पोटे, मेघा माने व इतर मान्यवर उपस्तीत होते.
मलबार गोल्ड यांचा उपक्रम कौतुकास्पद असून गरजवंत यांचा आशीर्वाद मिळणार असून आशा उपक्रमाची गरज असून इतर संस्थानी आदर्श घेण्याची गरज असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
सी एस आर फंडाच्या माध्यमातून सदर उपक्रम राबवित असून एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्थानक,धार्मिक स्थळ बाहेरील गरजवंत व वैद्यकीय रुग्णालय येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी आणि समाज्यातील भुकेलेल्यांना अन्न देण्याचा सदर उपक्रम आज पासून कायमस्वरूपी चालू राहणार असून दररोज १०० लोकांना मोफत अन्न देणार असल्याचे
मलबार गोल्ड अँड डायमंड चे बारामती शाखा व्यवस्थापक रोहित अवाडे यांनी सांगितले.
स्टोअर प्रमुख अब्दुल रहीम यांनी आभार प्रदर्शन केले.