जातीनिहाय जनगणनेचे महत्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तीव्र लढा उभारणार-माजी खासदार समीर भुजबळ

फलटण येथील जिल्हा स्तररीय बैठकीत मार्गदर्शन करताना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ व इतर मान्यवर

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १६ जुलै २०२५):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली केंद्र सरकारच्या वतीने नजीकच्या काळात जातीनिहाय जनगणना होईल ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात अनेक प्रश्न आहेत, वेळोवळी निघणाऱ्या मुद्द्यांचे निराकारण जातनिहाय जनगणनेतून होणार आहे, यासाठी जातीनिहाय जनगणनेचे महत्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तीव्र लढा उभारला जाणार आहे या साठी राज्यातील सर्व भागात आढावा बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले . अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा नंतर सातारा जिल्ह्यातील फलटण येथे जिल्हा स्तरावरील बैठक संत सावता महाराज मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती या वेळी भुजबळ बोलत होते समीर भुजबळ पुढे म्हणाले, भाटिया कमिशनमुळे ओबीसी आरक्षण कमी झाले होते समता परीषदेच्या माध्यमातून सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करून ओबीसी राखले असले तरी आपण संघटत जागृत राहिले पाहिजे तळागाळातील लोकांपर्यंत जातनिहाय जनगणनेचे महत्व समजावून सांगणे जातीनिहाय जनगणनेत भाग घेणं किती आवश्यक असून सर्व जाती जमातींच्या नागरीकांनी काळजीपूर्वक जागृतपणे आपल्या नोंदी करणे गरजेचे आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदेच्या वतीने समता परीषदेच्या संघटन मजबूत बांधणी संदर्भात आढावा बैठका घेऊन येणाऱ्या काळात जातीनिहाय जनगणने संदर्भात लोकांना प्रबोधन, मार्गदर्शन करण्यासाठी विभागवार बैठकाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा, विदर्भ तदनंतर सोलापूर, कोल्हापूर नंतर सातारा जिल्ह्यात फलटण. येथे आज सातारा जिल्ह्यातील फलटण येथे अ. भा. महात्मा फुले समता परिषदेची सातारा जिल्हा आढावा बैठक घेतली. या बैठकीत सातारा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांशी संवाद साधत त्यांची भूमिका, मते व अडचणी जाणून घेतल्या. तसेच बैठकीला उपस्थित नवे व जुने पदाधिकारी, समता सैनिक यांना संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने व संघटनेच्या कामाबाबत भुजबळ साहेब यांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीबरोबरच अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांच्या आढावा दौऱ्याची सांगता झाली. आगामी काळात महाराष्ट्राच्या उर्वरित भागात देखील आपण समता परिषदेच्या आढावा बैठका घेणार आहोत. आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी, अठरापगड समाजामध्ये जनजागृती करून त्यांची एकजूट मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे समीर भुजबळ यांनी सांगितले

यावेळी कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर, प्रदेश चिटणीस डॉ. स्नेहा सोनकाटे, प्रदेश प्रचारक प्रा. संतोष विरकर, डॉ. नागेश गवळी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेवसे, फलटण तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष पै बजरंग गावडे, समता परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख दशरथ फुले, प्रदेश प्रवक्ते दशरथ ननावरे, तालुकाध्यक्ष महादेव क्षीरसागर, तालुकाध्यक्ष राजेंद्र कोरडे, डॉ. बी. के. यादव, बाळासाहेब ननावरे, ॲड. महेश गोरे, शंकर गोसावी, संजय करपे, ॲड. सुनील नेवसे, प्रा. संपतराव नेवसे, शिवलाल गावडे, पिंटू इवरे,बाळासाहेब शेंडे, शरद कोल्हे, गिरीष बनकर, प्रा वसंतराव अडसुळ अरविंद राऊत , शाहीर फरांदे, प्रकाश फरांदे, अमोल रासकर माधव जमदाडे विकास नाळे वैभव नाळे कुंडलीक नाळे,बापुराव कर्णे,रमेश शिंदे , विवेक शिंदे, विक्रम पखाले, सुजीत जाधव , दत्तात्रय बरळ,संदिप नेवसे पोपटराव दगडे,बापुराव काशिद, सहदेव शेंडे,डॉ युवराज कोकरे, बापुराव राऊत, सोपानराव जाधव, राजेद्र भागवत यांच्यासह सातारा , कोरेगाव,वाई,माण, खंडाळा समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!