आचार्य अकॅडमीचा ८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा – गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गौरव

आचार्य अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांबरोबर मान्यवर


फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १८ जुलै २०२५):-
(१७ जुलै )– १७२९ आचार्य अकॅडमीचा ८ वा वर्धापन दिन दिनांक १७ जुलै २०२५ रोजी मुक्ताई लॉन्स, सूर्यनगरी, बारामती येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने नीट, जेई ई, सी इ टी, २०२५ मध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या २०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा भव्य स्वरूपात पार पडला.

या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून मा. डॉ. रमेश तवडकर (अध्यक्ष, गोवा विधान सभा) उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी आत्मविश्वास, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यावर भर दिला आणि सांगितले:

“गोवा ही आता केवळ पर्यटन स्थळ म्हणून नाही, तर शैक्षणिक, शेतीप्रधान व सुरक्षित गोवा म्हणून नवी ओळख मिळवत आहे. ही ओळख घडवण्यात शिक्षण संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. संस्थापक प्रा. ज्ञानेश्वर मुटकुळे यांनी कमी वयातच उल्लेखनीय यश मिळवत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता आधारित शिक्षणाचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचं कार्य प्रेरणादायी ठरलं असून, आज आचार्य अकॅडमी हे नाव राज्यभर विश्वासाने घेतले जाते.”

कार्यक्रमात सर्व शाखांतील शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. सुमित सीनगारे, प्रा. प्रवीण ढवळे, कमलाकर टेकवडे, मा. साईयोगेश पांचाळ , संदीप सोनवणे, बापू काटकर, रोहित महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने परिश्रम घेतले.


चौकट:
आठ वर्षांत १७२९ आचार्य अकॅडमीने ग्रामीण व निमशहरी भागांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी देत एक नवा विश्वास निर्माण केला आहे. हा गौरव सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, त्यांच्या यशाचा सार्वजनिक उत्सव म्हणून मोठ्या अभिमानाने साजरा करण्यात आला.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!