
वरद रुपणवर याने फायरिंग मध्ये यश मिळवले
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १९ जुलै २०२५):-
बारामती तालुक्यातील ज्ञानसागर इंग्लिश मीडियम स्कूल सावळ या शाळेतील २० एनसीसी कॅडेट्सनी ७ जून ते १६ जून दरम्यान महाराष्ट्र ३ बटालियन मुख्य कार्यालय,पुणे येथे आयोजित CATC-708 (संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर) मध्ये निवड झाली होती. या १०दिवसांच्या शिबिरात विद्यार्थ्यांना पीटी (पीपीटी), ड्रिल (डीएसटी), फायरिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ आणि एनसीसीचा उद्देश आणि महत्त्व याबद्दल सखोल माहिती देण्यात आली. एनसीसी अधिकारी सीओ राजेश वाकडे यांनी माहिती दिली की, आशा शिबिरांमुळे मुलांमध्ये शिस्त आणि एकतेची भावना निर्माण होतेच, शिवाय ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्याही मजबूत होतात. दिवसाची सुरुवात सकाळी पीटीने होते त्यानंतर ड्रिल आणि नंतर विविध विषयांचे वर्ग होतात. संध्याकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळ आयोजित केले जातात. हे शिबिर विशेषतः दुसऱ्या वर्षाच्या कॅडेट्ससाठी आवश्यक आहे, कारण “ए” प्रमाणपत्रासाठी ते अनिवार्य आहे. शाळेचे संस्थापक डॉ. सागर आटोळे म्हणाले की, या शिबिराचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि एकतेची भावना निर्माण करणे आहे. शाळेचा विद्यार्थी वरद रुपनवर याने फायरिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शाळेचे नाव उंचावले.अशी अभिमानाची माहिती त्यांनी दिली. ही कामगिरी केवळ शाळेसाठी अभिमानाची नाही तर इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल.या कॅम्प मध्ये संकुल देवकर, आदित्य कोकरे,संकेत जावरे, गौरव काटे,रोहित पाटील ,अनिल जाधव,राजीव वाडकर,वरद रुपनवर,कार्तिक टिळेकर, सिद्धनाथ करे,यश खटके ,अथर्व कुंभार ,ओम ढोबळे,ओमराज पाटील ,अनुष्का झगडे,राजनंदिनी दराडे ,श्रावणी जाधव, स्नेहल दराडे,ज्ञानेश्वरी अनिल झगडे ,ज्ञानेश्वरी श्रीपती झगडे हे विद्यार्थी सहभागी होते.या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे एनसीसी विभाग प्रमुख मेजर चव्हाण व सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव मानसिंग आटोळे , उपाध्यक्षा रेश्मा गावडे संचालिका पल्लवी सांगळे , दिपक सांगळे, दिपक बिबे , सीईओ संपत जायपत्रे, विभाग प्रमुख गोरख वणवे मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, सुधीर सोनवणे , निलिमा देवकाते,राधा नाळे,निलम जगताप, भावना कोठावळे, जास्मिन काझी व सर्व शिक्षकांनी विशेष कौतुक केले.