मिहिका हेंद्रे च्या परिवाराकडून प्रशालेस ५० रोपे वाढदिवसानिमित्त भेट

मिहिकाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना प्राचार्य श्री वसंतराव शेडगे व इतर मान्यवर

मुलीच्या वाढदिवसानिमित्त ५० रोपे दिल्याबद्दल देवेंद्र हेंद्रे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना प्राचार्य वसंतराव शेडगे ,सौ हेंद्रे श्रीमती हेंद्रे ,आर बी निंबाळकर , अभिजीत माळवदे ,अमोल नाळे
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २१ जुलै २०२५):-
फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थिनी कु मिहिका देवेंद्र हेंद्रे या विद्यार्थिनीनी प्रशालेस आपल्या वाढदिवसानिमित्त निसर्ग संवर्धनासाठी विविध जतीचे रोप भेट देवून पर्यावरणाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.व पर्यावरणाप्रती असलेले प्रेम व वृक्ष संवर्धन ही काळाची असलेली गरज या जाणिवेतून तिने आपला वाढदिवस प्रशालेस भेट देऊन साजरा केला.
यावेळी बोलताना प्रशालेचे प्राचार्य श्री वसंतराव शेडगे म्हणाले की सध्या मानवाकडून पर्यावरणाची होणारी हानी रोखणे ही आपली जबाबदारी असून आपण त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे व मिहिकाने व तिच्या पालकांनी जसा पर्यावरणाप्रती असलेल प्रेम आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त साजरा करून जपले तसेच पर्यावरण संवर्धनासाठी इतर मुलांनी ही ही चळवळ उभी करून ती पुढे नेहली पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी प्राचार्य यांच्याकडून कु. मिहिका हिला वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा! देण्यात आल्या यावेळी तिचे पालक श्री देवेंद्र माधवराव हेंद्रे यांच्या हस्ते व आदरणीय प्राचार्य वसंतराव शेडगे , माध्यमिक विभागाचे उपमुख्याध्यापक ए. वाय. ननवरे, उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य सोमनाथ माने . पर्यवेक्षक आर बी. निंबाळकर. पर्यवेक्षक आर एस नाळे यांच्या हस्ते प्रशाले मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मिहिकाची आई , आजी , हरित सेनेचे उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख श्रीकांत तावरे , माध्यमिक विभागाच्या प्रमुख कु संगीता कदम, शंकर तडवी , शिवाजी बनकर, सुधाकर वाकुडकर, अभिजीत माळवदे, अमोल नाळे, संदीप पवार, सागर बोराटे, अविनाश पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.