१७ वर्षाखालील मुलांचा व मुलींचा संघ जिल्हास्तरीय सुब्रोतो फुटबॉल करंडक स्पर्धेचा मानकरी

श्रीमंत शिवाजीराजे (सी बी एस इ ) जिल्हास्तरीय सुब्रोतो फुटबॉल करंडक स्पर्धेचा मानकरी मुलींचा संघ

श्रीमंत शिवाजीराजे (सी बी एस इ ) जिल्हास्तरीय सुब्रोतो फुटबॉल करंडक स्पर्धेचा मानकरी मुलानचा संघ
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २१ जुलै २०२५):– जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व माणदेशी चॅम्पियन्स म्हसवडयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी करंडक फुटबॉल स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन म्हसवड येथील माणदेशी क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते
या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील मुलांच्या स्पर्धेत ३६ संघांनी तर मुलींच्या १६ संघानी सहभाग नोंदवला होता या स्पर्धा बादफेरी मध्ये खेळवण्यात आल्या होत्या .
या स्पर्धेत फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सी बी एस इ) जाधववाडी, फलटण या संघाने १७ वर्षाखालील मुलीच्या व मुलांच्या गटात दुहेरी मुकुट मिळवत सुवर्ण अशी कामगिरी केली व जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी करंडक फुटबॉल स्पर्धा २०२५-२६ चे दोन्हीही संघ विजेते ठरले .
१७ वर्षाखालील मुलींच्या संघाचा पहिला सामना सामना यशोदा पब्लिक स्कूल सातारा या संघा बरोबरच झाला हा सामना शिवाजीराजे संघाने २/० अश्या फरकाने विजय मिळवला. तर दुसरा सामना शिवाजी विद्यालय सुरूर या संघाबरोबर झाला व २/० अश्या फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली उपांत्य फेरीचा सामना पोद्दार इंटरनॅशनल स्कूल कराड संघाबरोबर झाला हा सामना २/० फरकाने जिंकत विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक मारली अंतिम सामना ब्लॉसम स्कूल अँड हायस्कूल सातार या संघाबरोबर झाला व २/० च्या फरकाने जिंकत जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी करंडक फुटबॉल स्पर्धेचा मुलींचा संघ मानकरी ठरला.अंतिम सामन्यात कु.वेदिका पाटील व सई निंबाळकर यांनी एक एक गोल नोंदवत उत्कृष्ट कामगिरी करत संघास विजेते पद मिळवून दिले.
तर १७ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल( सी बी एस इ )संघाचा पहिला सामना पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सातारा या संघाबरोबर झाला व १/० अश्या फरकाने हा सामना जिंकत विजय मिळवला , दुसरा सामना सेंट पॉल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सातारा या संघा बरोबर झाला व हा सामना २/० फरकाने जिंकत विजय मिळवला तर तिसरा सामना सेंट झेवियस हायस्कूल संघाबरोबर एकही गोल न होता बरोबरीत सुटला आणि पेनल्टी शूटआउट वरती हा सामना ३/२ आश्या फरकाने विजय मिळवत शिवाजीराजे संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला उपांत्य फेरी चा सामना निर्मला कॉन्व्हेंट स्कूल सातारा संघाबरोबर खेळला गेला निर्धारित वेळेत हा सामना १/१ गोलने बरोबरीत राहिला व
पेनल्टी शूटआउट वरती हा सामना शिवाजीराजे संघाने ३/२ अश्या फरकाने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला अंतिम फेरीचा सामना न्यू इरा हायस्कूल पाचगणी संघाबरोबर झाला व २/१ अश्या फरकाने विजय मिळवत मुलांचा संघ जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी करंडक फुटबॉल स्पर्धेचा मानकरी ठरला.या अंतिम सामन्यात
मिहीर यादव व अथर्व तरटे यांनी एक एक गोल नोंदवत उत्कृष्ट कामगिरी करत संघास विजेतेपद मिळवून दिले.
वरील संघांतील १७ वर्षाखालील मुलींच्या व मुलांच्या फुटबॉल संघास क्रीडा प्रशिक्षक अमित काळे व जेष्ठ क्रीडा प्रशिक्षक संजय फडतरे यांचे मार्गदर्शन लाभले.
जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी करंडक फुटबॉल स्पर्धेत विजेता ठरलेल्या महिला फुटबॉल संघाचे व मुलांच्या फुटबॉल संघातील खेळाडूंचे व त्याना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक यांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे मा.सभापती तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार मा दीपकराव चव्हाण,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळा चे सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समिती चेअरमन श्री शिवाजीराव घोरपडे, सचिव सचिन धुमाळ,सदस्य श्री शिरीष वेलणकर , श्री महादेवराव माने, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम, तपासणी अधिकारी श्री दिलीप राजगुडा, सहायक तपासणी अधिकारी श्री सुधीर अहिवळे प्रशालेचे प्राचार्या सौ मीनल दिक्षित, उपप्राचार्य सौ स्नेहल भोसले , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच इतर शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

