फलटण आगारा मार्फत खास श्रावण मास दर्शन यात्रा आयोजन!


फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २२ जुलै २०२५):- दि.२५ जुलै पासुन श्रावण मास प्रारंभ होत आहे.श्रावण मासात भाविकांना धार्मिक स्थळांना भेट देण्या साठी विवीध दर्शन यात्रा बसचे फलटण आगारा मार्फत आयोजन करण्यात आले आहे.
अक्कलकोट – तुळजापूर पंढरपूर दर्शन, अष्टविनायक दर्शन ,कोल्हापूर- आदमापूर जोतिबा दर्शन, शनिशिंगणापूर- शिर्डी दर्शन ,थेऊर-भिमाशंकर दर्शन ,साडे तिन शक्तिपीठ दर्शन , परळी वैजनाथ -औंढा नागनाथ -शेगाव दर्शन या प्रमाणे दर्शन बसचे आयोजन करण्यात आले आहे.
या दर्शन बस मध्ये ज्येष्ठ नागरिकांना ५०% सवलत तसेच महिलांना महिला सन्मान योजनेअंतर्गत ५०% सवलत देण्यात येणार आहे. तरी खास श्रावण मासा निमित्त भक्तासाठी दर्शन सहल आयोजित केली आहे ,सर्व प्रवासी बंधू भक्तांनी या सेवेचा चा लाभ घ्यावा व सुरक्षित प्रवासासाठी एस.टी. बसने प्रवास करावा असे आवाहन प्रभारी आगार व्यवस्थापक श्री.राहुल वाघमोडे यांनी केले आहे.बुकिंग साठी संपर्क श्री. राहुल वाघमोडे,प्रभारी आगार व्यवस्थापक -९६३७२१२२९६
श्री.शुभम रणवरे,सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक -९९६०८०९३६२
श्री. सुहास कोरडे,प्रभारी स्थानक प्रमुख -९५२७८३१२६२
श्री.रविंद्र सूर्यवंशी,वाहतुक निरीक्षक -९०२९३५७८१०
श्री.सुखदेव अहिवळे,सहाय्यक वाहतूक निरीक्षक -९८५०८०२४८०
श्री.धिरज अहिवळे,सहाय्यक वाहतूक निरीक्षक -७७५७८८६७८६
श्री.प्रमोद साळुंखे-वाहतुक नियंत्रक-ग्रुप बुकींग साठी संपर्क ९१५८७३५१५१

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!