बारामती कराटे असोसिएशनचे १३ प्रशिक्षक राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक परीक्षा उत्तीर्ण

यशस्वी स्पर्धकांचा सन्मान करत असताना मान्यवर

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २२ जुलै २०२५):-
कराटे इंडिया ऑरगनायझेशन (KIO)च्या वतीने ‘राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक परीक्षा’चे आयोजन द कल्याणी इंटरनॅशनल स्कूल, मांजरी (हडपसर) येथे करण्यात आले. या परीक्षेचे आयोजन साऊथ एशियन कराटे फेडरेशनच्या रेफरी कमिशनच्या चेअरपर्सन शिहान शाहीन अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

या परीक्षेमध्ये ट्रॅडिशनल शोतोकान अँड स्पोर्ट्स कराटे ऑर्गनायझेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या बारामती कराटे असोसिएशनचे १३ प्रशिक्षक सहभागी झाले होते. सर्व प्रशिक्षकांनी लेखी व प्रात्यक्षिक चाचणीत उत्कृष्ट कामगिरी करत परीक्षकांची कसोटी उत्तीर्ण करत राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक परीक्षेत यश मिळवले.

उत्तीर्ण प्रशिक्षक व त्यांचे ग्रेड पुढीलप्रमाणे:
रविंद्र बाळकृष्ण करळे – रेफरी ए
अभिमन्यू बाबासाहेब इंगुले – रेफरी ए
शिवाजी गुलाब भिसे – रेफरी ए
तेजस रविंद्र कांबळे – रेफरी ए
अनुराग राजेंद्र देशमुख – रेफरी ए
राजन बळवंत शिंदे – जज बी
ऋषिकेश शंकर मोरे – जज बी
हर्ष सचिन भोसले – जज बी
तेजस्विनी राजेंद्र जगताप – जज बी
फरजांना रियाज पठाण – जज बी सिद्धी शंकर करळे – प्रशिक्षक कॅम्प
श्रुती शंकर करळे -प्रशिक्षक कॅम्प
जय साबळे -प्रशिक्षक कॅम्प
या यशस्वी प्रशिक्षकांना केआयओ चे अध्यक्ष हांशी भारत शर्मा यांच्या हस्ते प्रमाणपत्र, बॅच आणि टाय प्रदान करून गौरविण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे मा. जगन्नाथ लकडे, कराटे डू असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष शिहान सल्लाऊद्दीन अन्सारी, उपाध्यक्ष रेंशी परमजीत सिंग, , सचिव शिहान संदीप गाडे, तसेच महाराष्ट्र रेफरी कमिशनचे सदस्य शिहान रविंद्र सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशिक्षकाच्या या यशाबद्दल ट्रॅडिशनल शोतोकान आणि स्पोर्ट कराटे ऑरगॅनझेशनचे प्रमुख शिहान रविंद्र करळे व सर्व सदस्य, पालक, खेळाडू यांनी अभिनंदन केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!