
डॉ प्रसाद जोशी
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २७ जुलै२०२५,आरोग्यवर्ता):–
पूर्वीचे एक प्रचलित गाणे आठवले ….. ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए , गाना आये या ना आये ,गाना चाहिए !
आपल्याला लहानपणापासून गरम पाण्याची अंगोळ करण्याची सवय असते आणि पिताना खूप थंड पाणी प्यावेसे वाटते .
पण सायंटिफिकली बघितले तर हे बरोबर उलटे करायला पाहिजे
थंड पाणी आणि शरीर याचे आपण दोन भाग करूयात.
१. अंगावर बाहेरून घ्यायचे पाणी .
२. शरीरात तोंडाने आत घ्यायचे पाणी.
१. अंगावर बाहेरून घ्यायचे पाणी ..
अंघोळ ही खरे म्हणजे थंड पाण्यानेच करावी पण आपण तसे करत नाही . पूर्वी ची लोक पहाटे लवकर उठून थंड पाण्याने अंघोळ करीत असे आणि त्यांचे आरोग्य उत्तम राहत होते.
बोस्टन मधील हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधील काही शास्त्रज्ञांनी यावर संशोधन करून असा निष्कर्ष काढला आहे की थंड पाण्यानी अंघोळ केल्याने आपल्या शरीरावर खूप सकारात्मक आणि चांगले परिणाम दिसून येतात. सर्वात महत्वाचे म्हणजे आरोग्य आणि आयुष्य दोन्ही सुधारते.
थंड पाण्यानी अंघोळ केल्याने शरीरावर काय फायदे होतात ते आता बघुयात..
.रोगप्रतिकारशक्ती वाढवते:
थंड पाण्याने अंघोळ केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे शरीर विविध आजारांशी लढण्यासाठी तयार होते.
.रक्ताभिसरण सुधारते:
थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि रक्ताभिसरण सुधारते.
.ताण कमी करते:
थंड पाण्याने अंघोळ केल्याने तणाव कमी होतो, ज्यामुळे मन शांत आणि अधिक उत्साही वाटते.
.स्नायू मजबूत होतात:
थंड पाण्यामुळे स्नायू मजबूत होतात आणि वेदना कमी होतात.
.त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर:
थंड पाणी त्वचेला आणि केसांना चमक देण्यास मदत करते.
.चयापचय वाढवते:
थंड पाण्यामुळे चयापचय वाढतो, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
इतर फायदे:
.शरीराला ताजेतवाने आणि उत्साही वाटते:
थंड पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला ताजेतवाने आणि उत्साही वाटते.
.नैराश्य कमी होते:
थंड पाण्याने अंघोळ केल्याने नैराश्य कमी होते आणि मन प्रसन्न राहते.
थंड पाण्याने अंघोळ कोणी करू नये:
- थंडी वाजण्याची समस्या असलेले लोक, ज्यांना जास्त थंडी सहन होत नाही त्यांनी थंड पाण्याने अंघोळ करणे टाळावे.
- हृदयविकार किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले लोक डॉक्टरांचा सल्ला घेऊनच थंड पाण्याने अंघोळ करावी.
थंड पाण्याने अंघोळ करताना काय काळजी घ्यावी… - थंड पाण्याने अंघोळ करताना हळू हळू सुरुवात करावी आणि गरजेनुसार पाण्याची तीव्रता कमी-जास्त करावी.
- थंड पाण्याने अंघोळ करताना अस्वस्थ वाटल्यास लगेच थांबावे आणि गरम पाण्याने अंघोळ करावी. त्यासाठी गरम पाणी शेजारी एका बादलीत तयार ठेवावे .
- सुरवातीला सर्दी होण्याची शक्यता आहे . पण ती काही दिवसात बरी होते.नाही झाली तर थोडे दिवस परत गरम पाण्याची अंगोळ करावी.
अशी हळूहळू सवय केल्यास आपल्याला थंड पाण्याने अंघोळ केल्याचे वरील सर्व फायदे मिळून उत्तम आरोग्य मिळू शकते.
२. शरीरात तोंडाने आत घ्यायचे पाणी.
हे मात्र शक्यतो थंड नसावे .
सकाळी उठल्या उठल्या तोंड न धुता कोमट पाणी करून त्यात एक चमचा मध टाकून थोडेसे लिंबू पिळून घोट घोट घेतल्यास पचन संस्था सुधारते . ( रात्रभराची साठलेली लाळ ह्यामध्ये खूप चांगले जंतू असतात जे पचनसंस्था मजबूत करतात).
माठातील नैसर्गिकरित्या गार केलेले थंड पाणी केव्हानी चांगले ,पण ते जेवण करायच्या आधी अर्धातास किंवा जेवण केल्यावर दीड तासांनी प्यावे.
फ्रिज मधले थंडपाणी कधीच पिऊ नये ,कारण त्याला शास्त्रीय कारण आहे . जेव्हढे थंड पाणी तेव्हढे जठरातील ऍसिड dilute केले जाते आणि मग अन्न पचत नाही तर सडते आणि मग गॅसेस , बद्धकोष्ठता आणि पोट दुखी सुरू होते.
तर प्रियजनहो ,
करा अंघोळ तुम्ही थंड पाण्याची ,
मिळेल तुम्हाला आरोग्य संजीवनी ,
प्या कोमट किंवा साधे पाणी ,
होईल पचन उत्तम आणि सुचतील मधुर गाणी
जनहितार्थ जारी 🙏
आपला आरोग्याभिलाशी,
डॉ प्रसाद जोशी 🙏