
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण २७ जुलै २०२५):- बुधवार दिनांक ३० जुलै २०२५ रोजी सकाळी ०९:३० वाजता फलटण तालुक्यासह शहरांमध्ये उत्साहाने साजरी होणाऱ्या नागपंचमी सणानिमित्त श्रीमंत अनिकेतराजे मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे पतंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे उदघाटन सातारा जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून स्पर्धेचे बक्षिस वितरण मा.आमदार दिपकराव चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी फलटण नगर परिषदेचे मा.नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर (बाबा), फलटण पंचायत समितीचे मा.सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर (बाळराजे), गोविंद मिल्कचे संचालक श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. वेलणकर श्री दत्त मंदिर शुक्रवार पेठ, फलटण या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पतंग स्पर्धेवेळी चायना मांजा वापरण्यास सक्त मनाई आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.