
फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती दि ३० जुलै २०२५):- बारामती मधील खंडोबानगर येथे झालेल्या भीषण अपघातात आचार्य कुटुंबातील वडील आणि दोन लहान मुलींचा दुर्दैवी मृत्य झाल्यावर त्याच धक्क्याने ओंकार आचार्य यांच्या वडिलांचे देखील निधन झाले,या दुःखद घटनेने संपूर्ण बारामती हळहळ व्यक्त करत आहे,
गेल्या काही दिवसांपासून बारामती शहर हद्दीत अपघाताचे प्रमाण वाढले असून प्रामुख्याने अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या हायवा मुळे अनेक निष्पाप जीव गमवावे लागले आहेत,
आज प्रशासकीय भवन येथे झालेल्या आंदोलन मध्ये बारामतीकर हे प्रशासनावर रोष व्यक्त करताना दिसले आंदोलन कर्त्यांनी प्रशासकीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने बारामती शहरामधील अरुंद झालेले रस्ते,रस्ते दुभाजक,पार्किंग ची समस्या,रस्त्याच्या दुतर्फा होणारे अतिक्रमण,अनेक नागरी भागात व मुख्य रस्त्यावर स्ट्रीट लाईट ची समस्या,शाळा,कॉलेज सुटल्यानंतर शहरात होणारी वाहतूक कोंडी, अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर वरती पांढरे पट्टे नसल्याने होणारे अपघात,बारामती शहरात,पेन्सिल चौक येथे सिग्नल बसवणे, शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी cctv बसवणे, रस्त्याच्या कडेला सुशोभित केलेल्या परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी केलेल्या ठिकाणी सेफ्टी जाळी बसवावी,शहरात व अंतर्गत रस्त्यावर गतिरोधक बसवावे,अवैध वाहतूक वरती कारवाई करावी,चौका चौकात ट्राफिक पोलीस नियुक्त करावे व त्यांना ट्राफिक नियोजन करण्यात लक्ष देण्यास सूचना कराव्या,सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत अवजड वाहतूक बारामती शहरातून बंद करावी,सातव चौक रेल्वे ब्रिज वरती अवजड वाहतूक बंद करावी,सातव चौक तांदुळवाडी रोड येथे अनेकांत शाळा व टेक्निकल शाळा सुटल्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होते यावर उपाययोजना कराव्या व चौकात रोडवरती उभे करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी,कारभारी चौक सर्कल कमी करावा,पेन्सिल चौक येथे होणारी वाहतूक कोंडी वरती उपाययोजना कराव्यात, तीन हत्ती चौक चौकाचे सुशोभीरण मुळे वाहतुकीचे फसलेले नियोजन पूर्ववत करावे,अवजड वाहनांचे मूळ कागदपत्र तपासावी,अल्पवयीन वाहनचालक मुलांवर कारवाई करावी,अपघातग्रस्त रुग्णांना त्वरित उपचार मिळावे,सरकारी रुग्णालयात आधुनिक यंत्रणा उपलब्ध करून दयावी,मुख्य चौकात व मुख्य रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी,सिनेमा रोड,मारवाड पेठ,गांधी चौक,नेवसे रोड,सातव चौक,गुणवडी चौक येथे वाहतूकचे योग्य नियोजन व नो पार्किंग झोन तयार करावे असे बारामतीकरांच्या एकत्रित सूचना घेऊन प्रशासनास निवेदन देण्यात आले,
यावेळी प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घेऊन विकासकामे करावी,तसेच वार्डनिहाय एकत्रित नागरिकांच्या सूचना घेऊन त्यानुसार योग्य उपाययोजना कराव्यात अशीही मागणी बारामतीकरांनी सदर निवेदनात केली आहे,