
अजितदादा इंग्लि श मीडियम स्कूलच्या विद्यार्थी सीमेवर राख्या पाठवत असताना
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १२ ऑगस्ट २०२५):-
कटफळ येथील अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूल, मधील सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या राख्या व ग्रीटिंग्स बेळगाव सेंटर आर्मी येथे पाठवून एक अनोखा उपक्रम राबविला. या उपक्रमात पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
शाळेतील मुलींनी आकर्षक व मनमोहक ग्रीटिंग्स तयार करून देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना भावपूर्ण संदेश पाठवले. मुलांनी व मुलींनी मिळून प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञतेचे प्रतीक असलेल्या राख्या स्वतःच्या हस्तकौशल्याने साकारल्या.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेचे संस्थापक संग्राम मोकाशी, सचिव सौ. संगीता मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत वनवे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत झाली असून, सैनिकांनाही विद्यार्थ्यांच्या या प्रेमळ भेटीमुळे मनापासून आनंद होणार आहे.