
राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वरदा कुलकर्णी यश यश मिळाल्यावर आनंद व्यक्त करताना
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १२ ऑगस्ट २०२५):-
स्पेशल ऑलिम्पिक भारत नॅशनल स्विमिंग स्विमिंग स्पर्धा दि. ०३ ऑगस्ट ते ०६ ऑगस्ट या दरम्यान कांदिवली मुंबई येथे पार पडल्या.
या स्पर्धेमध्ये वीर सावरकर स्वीमर्स क्लब बारामती ची
वरदा संतोष कुलकर्णी हिने फ्री स्टाईल मध्ये सिल्व्हर मेडल प्राप्त केले. या स्पर्धेमध्ये भारतातली विविध राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धा भरविण्याची संधी पहिल्यांदाच महाराष्ट्र एस. ओ.बी. यांना मिळाली होती. महाराष्ट्रातून विविध वयोगटातील फक्त ०४ मुलींची निवड या स्पर्धेसाठी झाली . पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व वरदा हिने केली. वरदा ने याआधीही प्यारा ऑलिंपिक नॅशनल स्पर्धा पणजी व स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धा कर्नाटक येथे भरीव कामगिरी केली होती.वरदा ही वीर सावरकर जलतरण तलाव बारामती येथे सराव करीत आहे. तिच्या यशामध्ये तिचे कोच ओम
सावळेपाटील व मार्गदर्शक इरफान तांबोळी, सुभाष बर्गे यांचे मोलाचे योगदान आहे. ग्रामीण भागातील दिव्यांग विद्यार्थिनी ने आपल्या चिकाटीने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमक दाखवली या बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. वीर सावरकर जलतरण तलावाचे अध्यक्ष डॉ.अशोक तांबे , सचिव विश्वास शेळके, खजिनदार मिलिंद अत्रे व सल्लागार सदाशिव सातव व जवाहर वाघोलीकर यांनी अभिनंदन केले.