‘हर घर तिरंगा २०२५’ उपक्रमांतर्गत मुधोजीच्या विद्यार्थांनी रॅलीद्वारे केली जनजागृती.

मुधोजीच्या विद्यार्थ्यानी ‘हर घर तिरंगा २०२५’ उपक्रमांतर्गत घेतली ‘तिरंगा प्रतिज्ञा’

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १३ ऑगस्ट २०२५):-
शासन निर्देशानुसार फलटण शहरामध्ये ‘हर घर तिरंगा २०२५’ उपक्रमांतर्गत फलटण नगर परिषद , तहसील कार्यालय, पंचायत समिती व फलटण मधील सर्व शासकीय कार्यालय यांच्यातर्फे फलटण शहरातील नगरपरिषद व शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, उपशिक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांची दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०९:०० वाजता तिरंगा रॅली व तिरंगा प्रतिज्ञा हा कार्यक्रम आयोजित केलेला होता.


यानिमित्ताने फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने सकाळी आठ वाजता प्रशालेत तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी प्रशालेचे प्राचार्य वसंतराव शेडगे,पर्यवेक्षक रावसाहेब निंबाळकर ,राजेंद्र नाळे, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य सोमनाथ माने, प्रशालेचे एन सी सी विभाग प्रमुख दीपक पवार, बी बी खुरंगे, सचिन धुमाळ, संतोष तोडकर, अमोल नाळे, अनिल खोत, शिवाजी बनकर, वैशाली थोरात, विनिता लोणकर आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
त्यानंतर सकाळी नऊ वाजता तहसील कार्यालय फलटण येथे तिरंगा रॅलीसाठी उपस्थित रहाऊन ही रॅली तहसील कार्यालय-
-महात्मा फुले चौक-गजानन चौक- उमाजी नाईक चौक – महावीर चौक-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी काढण्यात आली.


यावेळी रॅलीमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधील सहावी ते बारावी मधील विद्यार्थ्यांनी व आठवी आणि नववी मधील एन सी सी च्या विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला व या रॅलीमध्ये हर घरघर तिरंगा ची घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. आश्या पद्धतीने ही जनजागृती करून ही रॅलीचा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!