सातारा जिल्हयातील फलटण तालुका परिसरातील चैन स्नॅचिंग, जबरी चोरी गुन्हे करणाऱ्याटोळीतील ०२ इसमांना सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २९ ऑगस्ट २०२५):-
सातारा जिल्हयामधील फलटण तालुका हद्दीमध्ये सातत्याने मालमत्तेचे गुन्हे करणारे सराईत टोळी प्रमुख स्वप्नील उर्फ बाळु सुरेश जाधव वय २४ वर्षे, तसेच टोळी सदस्य निखील उर्फ काळु सुरेश जाधव वय २५ वर्षे, दोन्ही रा तावडी ता. फलटण, जि. सातारा यांचेवर टोळीने जबरी चोरी, दरोडा, चैन स्नॅचिंग
यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने फलटण शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. हेमंतकुमार शहा पोलीस निरीक्षक यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपुर्ण सातारा जिल्हा आणि सातारा जिल्हा हद्दीचा लगतचा भाग असलेले पुणे जिल्हयातील बारामती, इंदापुर व पुरंदर तालुका,सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका हद्दीतुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता.

सदर प्रस्तावाची चौकशी श्री. राहुल आर धस, तत्कालीन
उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यांनी केली होती.
फलटण शहर पोलीस ठाणे तसेच फलटण ग्रामीण पोलीस ठाणेमध्ये यातील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचेवर महीलांना, पुरुषांना कोयत्याचा धाक दाखवुन त्यांचेकडील मौल्यवान वस्तु जबरदस्तीने हिसकावुन घेणे यासांरखे मालमत्तेचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनसुध्दा त्यांना आपल्या टोळीने गुन्हेगारी कारवाया चालुच ठेवल्या आहेत. त्यांच्या टोळीवर कायदयाचा कोणताच
धाक न राहील्यामुळे फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठया प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर कायदयाचा वचक राहवा याकरीता सर्वसामान्य जनतेतुन त्यांचेवर कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
मा. तुषार दोशी, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर टोळी प्रमुख स्वप्नील उर्फ बाळु सुरेश जाधव वय २४ वर्षे, तसेच टोळी सदस्य निखील उर्फ काळु सुरेश जाधव वय
२५ वर्षे, दोन्ही रा तावडी ता. फलटण, जि. सातारा यांची सुनावणी होवुन त्यांनी सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपुर्ण सातारा जिल्हा आणि सातारा जिल्हा हद्दीचा लगतचा भाग असलेले पुणे जिल्हयातील बारामती, इंदापुर व पुरंदर तालुका, सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
सातारा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद काळात सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजु कांबळे, शिवाजी भिसे, म.पो. कॉ. अनुराधा सणस, फलटण शहर पोलीस ठाणेचे पो. हवा. बापु धायगुडे, पो. कॉ. जितेंद्र टिके यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!