
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २८ ऑगस्ट २०२५):-
दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाणेस माहिती मिळाली की, दालवडी येथे फॉरेस्टच्या बाजुला राहत असलेले रवीद्र कोलवडकर याच्या गाडीमध्ये पिस्तुल व गांजा आहे त्या अनुषंगाने पोलीसाना सदर ठिकाणी त्याना फॉरेस्टच्या जागेमध्ये स्वीफ्ट कार ही दिसुन आली त्यानंतर त्यापासुन २०० मीटरच्या अंतरावर असलेले रविद्र कोलवडकर याना घरातुन बोलावुन घेतले व त्याना कार चेक करावयाची असल्याचे सांगितले त्यानी स्वताहुन गाडी उघडली गाडी अनलॉक करुन गाडी चेक केली असता गाडी मध्ये गांजा व पिस्तुल व त्याच्यामध्ये जिवंत दोन राऊड हया कारमध्ये मिळुनआले
याबाबत रविद्र कोलवडकर याना विचारले असता ते सदरचा गांजा व पिस्तुल हे त्याच्या गाडीत कसे आले याबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले तरी सदर त्याच्या गाडीमध्ये गांजा व पिस्तुल व दोन
काडतुसे हे मिळुन आले आणि सदर बाबत अमली पदार्थ विरोधी कायदा कलम व आर्म अॅक्ट कलम याप्रमाणे गुन्हा दाखल करुन पोलीसांनी रविद्र कोलवडकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले व चौकशी करुन त्याच्यामधील आरोपी निष्पन्न करुन अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे.
सदर बाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन गुन्हा रजिष्टरन बर ६१६/२०१५ एन.डी.पी.एस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल असुन मा. पोलीस अधीक्षक श्री तुषार दोषी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक
कडुकर,उपविभागीय पोलीस अधिकारी भालचीम याचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक पोलीस उपनिरीक्षक श्री गोपाळ बदने, वैभव सुर्यवंशी, अमोल जगदाळे, नितीन चतुरे, हनुमंत दडस, तात्या कदम,तानाजी ढोले, तुषार नलवडे, कल्पेश काशिद यांनी तपासामध्ये सहभाग घेतला आहे
गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री बदने हे करीत आहेत.
