
श्रीमंत संजीवराजे यांनी प्रशालेत भेट दिली यावेळी मा प्राचार्या सौ मीनल दीक्षित यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी एसएससी विभागाच्या प्राचार्या सौ अंजुम शेख व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा(फलटण दि ३० ऑगस्ट २०२५):-
फलटण तालुक्यातील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई ), जाधववाडी , फलटण येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी भव्य आणि दिव्य असा उत्तर प्रदेश येथील श्री राम जन्मभूमी असलेल्या अयोध्या मंदिराचा देखावा निर्माण करण्यात आलेला आहे .

या प्रशालेमध्ये दरवर्षी कोणत्या ना कोणत्या मंदिराची प्रतिकृती चा देखाव्या स्वरूपात उभारणी करण्यात येत असते. मागील वर्षी या प्रशालेने फलटण येथील सुप्रसिद्ध श्रीमंत नाईक निंबाळकर राज घराण्याचा ”मनमोहन राजवाडा ” याची प्रतिकृती तयार केली होती. सदर देखाव्याची निर्मिती टाकाऊ वस्तूंपासून केली जाते. सदर देखावा पाहण्यासाठी मागील वर्षी पालक वर्ग व फलटण शहरातील व जाधववाडी परिसरातील अनेक गणेश भक्तांनी व नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.

सदर देखावा निर्मिती प्रशालेतील सेवक वर्ग व कलाशिक्षक आणि शिक्षकवृंद यांच्या परिश्रमातून तयार करण्यात येते .सदर मंदिराची प्रतिकृती तयार करण्यासाठी मागील एक महिन्यापासून येथील शिक्षकवृंद व सेवक वर्ग परिश्रम घेत होते .
यावर्षी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथील नुकतेच नवनिर्मित तयार करण्यात आलेले रामलला ची मूर्ती येथे विराजमान करण्यात आली आहे. तेथील आयोध्या मंदिर याची हुबेहुब प्रतिकृती या प्रशालेतर्फे उभारण्यात आलेली आहे. गेले दोन दिवस हा देखावा पाहण्यासाठी पालक वर्ग यांची खूप मोठ्या प्रमाणावर प्रचंड अशी गर्दी करीत आहेत . तसेच प्रशाले तर्फे फलटण परिसरातील नागरीक व गणेश भक्तांनी या देखाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशालेच्या प्राचार्या सौ मीनल दीक्षित यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

