गोखळी येथील जेष्ठ पत्रकार राजेंद्र भागवत यांचे अपघाती निधन

नात कु स्वरा भागवत गंभीर जखमी

फलटण टुडे वृत्तसेवा ( शारदानगर , प्रतिनिधी ) :-
बारामती – निरा रस्त्यावर शारदानगर येथे बारामती आगाराची राज्य परिवहन महामंडळाची बस आणि दुचाकी मध्ये अपघात झाला . या अपघातात फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार तथा फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र दिनकर भागवत ( वय 59 राहणार गोखळी तालुका फलटण )यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात त्यांची नात प्रसिद्ध सायकलपटू कु स्वरा भागवत ही गंभीर जखमी झाली आहे . तिच्यावर बारामती येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सकाळी पावणे सात वाजता हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारामतीकडून निरेकडे बस निघाली होती त्याचवेळी आपल्या नातीला शारदानगर येथे खेळाच्या सरावासाठी शाळेत सोडण्यासाठी राजेंद्र भागवत हे दुचाकीवरून आले होते त्यांची दुचाकी माळेगाव कडून शारदानगर कडे वळत असताना समोर आलेल्या भरधाव बसने जोरदार धडक दिली या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने राजेंद्र भागवत यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची नात स्वरा ही या घटनेमध्ये गंभीर जखमी झाली तिला तातडीने बारामती येथील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत .

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!