
फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. ३१): पर्यटन संचालनालयाव्दारे राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच राज्यात देशी- विदेशी, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सव मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. पुण्यात विविध सार्वजनिक गणेशेत्सव मंडळाव्दारे साजरा करण्यात येणारे गणेशोत्सव मोठया- मोठया व आकर्षक मुर्ती व विसर्जन सोहळा यांचे देश- विदेशातील पर्यटकांमध्ये मोठे आकर्षण आहे. महाराष्ट्र शासनाने नुकतेच गणेशोत्सव हा राज्यमहोत्सव म्हणून घोषित केले आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच आपल्या पारंपारिक कला व संस्कृतीची ओळख देशी – विदेशी पर्यटकांना करुन देण्यासाठी तसेच गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटनात्मक प्रसिध्दी देऊन राज्यात पर्यटकांना मोठया प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी पर्यटन संचालनालयाव्दारे व पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. व पुणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने गणेशोत्सव काळात देशी – विदेशी पर्यटकांसाठी पुण्यातील नामांकित गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शन सहलीचे आयोजन करणेत येत आहे.
या उपक्रमाअंतर्गंत वय 60 वर्षे व त्याहून अधिक वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांकरिता व दिव्यांग व्यक्तींना गणेश दर्शन सहल आयोजित करण्यात येत आहे. दि. 1 सप्टेंबर, 2025 रोजी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींसाठी त्रिशुंडया गणपती, कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग, दगडूशेठ हलवाई, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, बाबू गेनू गणपती व अखिल मंडई मंडळ या गणपतींच्या थेट दर्शनाची सुविधा करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे शहराकडे येणाऱ्या पाच मार्गांवरील बस डेपो हे Pick Up व Drop Points निश्चित करणेत आले आहेत. इच्छुकांसाठी दि. 1 सप्टेंबर, 2025 रोजी स. 8.30 ते दु. 1.30 वाजेपर्यंत कात्रज डेपो, हडपसर (गाडीतळ), कोथरुड डेपो, शिवाजीनगर (मॉडेल कॉलनी) व येरवडा (गुंजन टॉकीज) या डेपोमधून पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.यांच्या 5 वातानुकूलीत बसेस (प्रती बस 35 प्रवासींकरीता) उपलब्ध करून देणेत येतील.
ज्येष्ठ नागरिकांसाठी पर्यटन विभागाव्दारे गाईड, अल्पोपहार, बिसलेरी पाणी व आरोग्य सेवक (प्रथमोपचार किट सह) इत्यादीची सोय करण्यात येणार आहे. नाव नोंदणीकरणेरिता संपर्क क्रमांक गणेश बेंद्रे – 9730993282 करावा व Google Form – https://forms.gle/BbE36QZDyasCGH2SA व QR Codeसोबत जोडण्यात येत आहे. सदर Google Form वर नोंदण करण्यात यावी. तसेच, सदर गणेश दर्शन सहलीस जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपसंचालक यांनी केले आहे.
