
शिक्षण परिषदेत मार्गदर्शन करताना सौ दमयंती कुंभार व उपस्थित मान्यवर आणि शिक्षकवृंद
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ०५ सप्टेंबर २०२५) :- पंचायत समिती फलटण शिक्षण विभाग व बी आर सी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रेंद्रस्तरीय माहे ऑगस्ट ची शिक्षण परिषद फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे संपन्न झाली .
सदर शिक्षण परिषदेसाठी बी आर सी च्या तालुका समन्वयक सौ दमयंती कुंभार , मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य वसंतराव कृष्णा शेडगे, मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक रुपेश शिंदे , मुख्याध्यापक चव्हाण सर, केंद्र संचालक काशीद सर, कारंडे सर मुधोजी हायस्कूल चे पर्यवेक्षक आर बी निंबाळकर व आर एस नाळे इत्यादी उपस्थित होते .
शिक्षण परिषदेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन करून करण्यात आली . यानंतर स्वागतगीत प्रशालेतील विद्यार्थीनीनी गायीले तसेच यावेळी राष्ट्रगीत, राज्यगीत, प्रार्थना, सुविचार, बोधकथा इत्यादी घेऊन परिपाठ सादर करण्यात आला . यानंतर प्रमुख पाहुण्यांचे व मान्यवरांचे स्वागत प्रशालेमार्फत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले .

यावेळी उपस्थित शिक्षक वर्गास सुलभक श्री शिंदे सर यांनी निपून महाराष्ट्र अभियान या संदर्भात मार्गदर्शन केले .यानंतर यामुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटणचे सुलभक चंदन कर्वे यांनी नवोपक्रम कृती संशोधन या विषयावर मार्गदर्शन केले तसेच यावेळी हनुमंतराव पवार हायस्कूलच्या सौ अमृता निंबाळकर मॅडम यांनी कृती संशोधन म्हणजे काय ?याविषयी सखोल मार्गदर्शन केले . इन्स्पायर अवॉर्ड अध्यापन निष्पत्ती आधारित मासिक नियोजन यावर मार्गदर्शन चांगण सर यांनी केले . त्रैमासिक पालक आढावा बैठक यावरती सौ गुंजवटे मॅडम यांनी मार्गदर्शन केले . श्री ढेकळे सर यांनी पुस्तक परिचय व विद्यार्थ्या समोर पाठ कसा घ्यावा याचे एक उत्तम पाठघेऊन उदाहरण दिले.
सौ कुंभार मॅडम यांनी सर्व विषयावर थोडक्यात मार्गदर्शन केले
यावेळी केंद्रातील मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, मालोजीराजे शेती विद्यालय, सहकार महर्षी हणमंतराव पवार विद्यालय फलटण यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , वेणूताई गर्ल्स हायस्कूल , प्रमिलाताई चव्हाण हायस्कूल फलटण , बाळशास्त्री जांभेकर प्राथमिक व माध्यमिक हायस्कूल . फलटण क्रेंदातील शिक्षकवृंद शिक्षण परिषदेस उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी तृप्ती शिंदे व संजय गोफणे यांनी केले तर आभार आर एस नाळे यांनी मानले .


