१५ वर्षाखालील मुलांच्या हॉकी संघाने तर १७ वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या हॉकी संघाने मिळून तिहेरी विजेतेपद पटकावले.

जिल्हास्तरीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेजच्या १७ वर्षाखालील मुलांच्या संघास विजेतेपद प्रदान करताना जगन्नाथ धुमाळ ,महेश खुटाळे,सचिन धुमाळ,बी बी खुरंगे व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ०५ सप्टेंबर २०२५):-
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा , मुधोजी हायस्कूल व ज्यु.कॉलेज फलटण तसेच द हॉकी सातारा व फलटण तालुका क्रीडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय नेहरू चषक हॉकी स्पर्धा श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुल, फलटण येथे संपन्न झाल्या. या परपडलेल्या स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज च्या १५ वर्षाखालील मुलांच्या संघाने तसेच १७ वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या संघाने तिहेरी विजेतेपद पटकवले.
१५ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये अंतिम सामन्यांमध्ये श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलचा ५ – ० गोलने फरकाने जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या सामन्यामध्ये निलेश वेताळ, अनुराग शेलार, फरान शेख, शुभम रणवरे, यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून गोल नोंदवले. तसेच साईराज जराड, साईराज खरात, गोलकीपर समर्थ घाडगे यांनी उत्तम साथ देत उत्कृष्ट खेळ केला .
१७ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये अंतिम सामन्यामध्ये के. एस .डी .शानभाग विद्यालय सातारा संघाचा १२-० गोलने एकतर्फी विजय संपादन केला . या सामन्यामध्ये निकिता वेताळ, सिद्धी केंजळे, वेदिका वाघमोरे , श्रुतिका घाडगे, अनघा केंजळे, श्रेया चव्हाण, अनुष्का केंजळ, यांनी उत्कृष्ट खेळ करून गोल नोंदवले. बचावफळीमध्ये मानसी पवार, तेजस्विनी कर्वे, मृण्मयी घोरपडे, गौरी हिरवळे, तसेच गोलकीपर अनुष्का चव्हाण व आरोही पाटील यांनी देखील उत्कृष्ट खेळ केला.
१७ वर्षाखालील मुलांच्या संघाने देखील उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून अंतिम सामन्यात सैनिक स्कूल सातारा संघाचा ३-० गोल फरकाने विजय नोंदवून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या सामन्यामध्ये सर्वज्ञ तरटे या खेळाडूंनी सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला उत्कृष्ट मैदानी गोल नोंदवून सामन्याची सुरुवात आक्रमक चढाईने केली. या सामन्यामध्ये साईराज काटकर , विनय भोईटे, प्रयाग आढाव, शंभूराज शिंदे तसेच गोलकिपकर मोहित मदने यांने देखील उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
सर्व यशस्वी खेळाडूंना सीनियर हॉकी प्रशिक्षक श्री महेश खुटाळे, हॉकी मार्गदर्शक सचिन धुमाळ, क्रीडा शिक्षक श्री खुरंगे बी.बी. यांनी मार्गदर्शन केले. तसेच फिजिकल फिटनेस मार्गदर्शक ऋषी पवार व विनय नेरकर यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ हॉकी चे जेष्ठ मार्गदर्शक जगन्नाथ धुमाळ ,निवृत्त क्रीडा अधिकारी महेश खुटाळे यांच्या हस्ते पार पडला यावेळी एबीपी माझा चे बारामती प्रतिनिधी जयदीप भगत,फलटण टुडे संपादक अमोल नाळे, महेंद्र जाधव, अनराष्ट्रीय हॉकी पंच सुमित मोहिते , सुजित निंबाळकर ,विपुल गांधी व आजी माजी राष्ट्रीय हॉकी खेळाडू उपस्थित होते.
या विजयाबद्दल स्पर्धेत विजेता ठरलेल्या मुले व मुलींच्या हॉकी संघाचे, खेळाडूंचे व त्यानां मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक यांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे मा.सभापती तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार मा दीपकराव चव्हाण,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळा चे सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समिती चेअरमन शिवाजीराव घोरपडे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा, सहायक तपासणी अधिकारी सुधीर अहिवळे प्रशालेचे प्राचार्या वसंत शेडगे, उपप्राचार्य आण्णासाहेब ननवरे, सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर बी निंबाळकर ,आर एस नाळे,पूजा पाटील,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच इतर मान्यवर आणि शिक्षकवृंद यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
