
उमाजी नाईक यांची जयंती साजरी करताना मान्यवर व इतर
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २५ सप्टेंबर २०२५):-
शनिवार 20 सप्टेंबर रोजी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती अंजनगाव मध्ये साजरी करण्यात आली.
या प्रसंगी अंजनगावचे मा. सरपंच दिलीप परकाळे , दादासाहेब मोरे ,सुभाष वायसे ,सुभाष परकाळे, जालिंदर वायसे, प्रशांत कुचेकर व
अप्पासाहेब चव्हाण, वसंत चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सत्पाल चव्हाण, पोलीस पाटील ईश्वर खोमणे , अॅड. आनंद चव्हाण, संदीप चव्हाण, राजेश चव्हाण, नितीन चव्हाण, महेंद्र चव्हाण, दशरथ चव्हाण, अमर सस्ते, सूरज कुचेकर, सिद्धार्थ कुचेकर, सूरज मोरे, अक्षय परकाळे, चेतन वायसे, रोहित माकर , हनुमंत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
व्यख्याते आकाश वाघमारे व कन्हैया खोमणे यांनी उमाजी नाईक यांच्या कार्याची माहिती सांगितली आणि युवा वर्गाला मार्गदर्शन केले.
शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान व विविध खात्यांमध्ये निवड परीक्षार्थी यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

