
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या कुस्तीपटूंचे अभिनंदन करताना प्राचार्य वसंत शेडगे,सोमनाथ माने , रावसाहेब निंबाळकर, राजेंद्र नाळे,शिवाजी बनकर व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (गिरवी,दि. २५ सप्टेंबर २०२५):-
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य ,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद , सातारा आयोजित तालुकास्तरीय १४/१७/१९ वर्षाखालील मुले / मुली शालेय कुस्ती स्पर्धा २०२५-२६ दि १८ व १९ सप्टेंबर रोजी श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय , गिरवी येथे संपन्न झाल्या
यावेळी मॅटवरील तालुकास्तरीय फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केल.
१४ वर्षाखालील मुले
१) सोहमसिंह राहुल निंबाळकर ६८किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला.
१७ वर्षाखालील मुले
१)ओम् संजय शिर्के ६५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला.
१९ वर्षाखालील मुली
१ )विद्या किसन जाधव ५९ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला.
वरील सर्व खेळाडूंनी प्रतिस्पर्धी खेळाडूबरोबर नेत्रदिपक अशी कुस्ती करून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले व उपस्थित प्रेक्षकांची
मने जिंकली व स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या वरील सर्व खेळाडूंची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वरील सर्व खेळाडूंना मुधोजी हायस्कूल चे क्रीडा मार्गदर्शक शिवाजी बनकर यांचे मार्गदर्शन
लाभले.
मुधोजी हायस्कूल च्या यशस्वी सर्व कुस्तीपटू चे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विद्यमान सदस्य मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, क्रीडा सीमतीचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे,प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य वसंत कृष्णा शेडगे,उपप्राचार्य आण्णासाहेब ननावरे, सोमनाथ माने, पर्यवेक्षक राजेंद्र नाळे, रावसाहेब निंबाळकर , सौ पूजा पाटील, क्रीडा समिती सचिव सचिन धुमाळ
यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


