
फलटण टुडे वृत्तीच (फलटण, दि. २७ सप्टेंबर २०२५) : –
राजे ग्रुप फलटण, जायंटस् ग्रुप ऑफ फलटण सहेली आणि जय तुळजाभवानी ग्रुप, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून, ‘दांडिया धमाल’ या कार्यक्रमाचे आयोज फलटण शहरातील महिला आणि युवतींसाठी करण्यात आले आहे.
या दांडिया धमाल’ कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयात होणार आहे.
विविध प्रायोजकांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यां महिलांसाठी विविध आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.
या कार्यक्रमासाठी फलटण शहरातील महिलां व युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


