झैनबिया स्कूलमध्ये आंतरकुल मुटकोर्ट स्पर्धा संपन्न

आंतरकुल मुटकोर्ट स्पर्धा मधील यशस्वी विद्यार्थी व मान्यवर

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामत दि २९ सप्टेंबर २०२५):-
कटफळ येथील अब्बास मोहम्मद हुसेन एज्युकेशन ट्रस्ट संचलित झैनबिया इंग्लिश मिडियम स्कूल कटफळ च्या विभागातील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी मुट कोर्टचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना काही दिवस अगोदर समस्या विधान देऊन विद्यार्थ्यांना समस्येच्या याचिकाकर्ता तसेच प्रतिसादकच्या दिशेने माहिती गोळा करणे तसेच विविध माध्यमातून शोधमोहीम करण्यास सांगण्यात आले. स्पर्धेच्या दिवशी दोन संघ याचिकाकर्त्यांनी आणि प्रतिसादक यांनी आपापला युक्तिवाद मांडला.
या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी वकिली पोशाख परिधान करून आपापली बाजू मांडली. या स्पर्धेसाठी न्यायाधीश म्हणून बारामतीचे ॲड.कोमल खत्री,ॲड.राजेंद्र काळे आणि ॲड.अमोल आटोळे यांची उपस्थिती लाभली ॲड.राजेंद्र काळे आणि ॲड.कोमल खत्री यांनी विद्यार्थ्यांना न्यायिक मार्गदर्शन केले. तसेच मुलींमध्ये मुनीरा नासिकवाला, स्वरूपा खंडागळे, श्रेया सूर्यवंशी, मारिया हुसेनी, आर्या शिंदे, समीक्षा सूर्यवंशी व मुलांमध्ये यशराज राऊत, श्रेयश बिटके, मानस नाईकडे, आदित्य राऊत, अमृत मंद्रूपकर आदि. विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका प्राचार्य इन्सिया नासिकवाला यांनी मोलाचे कौतुक केले. यातून विद्यार्थ्यांच्या न्यायव्यवस्था, कायदे पद्धती, समस्येची कारणे, शोधप्रणाली अशा अनेक प्रकारच्या ज्ञानात भर पडली.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!