महाराष्ट्र चेंबर चे उद्योजकांसाठी चे कार्य महत्वपूर्ण : हनुमंत पाटील

परिसंवाद चे उदघाटन करताना हनुमंत पाटील व इतर मान्यवर

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २९ सप्टेंबर २०२५):-
उद्योजकांसाठी व्यवसायिक सुरक्षितता, आर्थिक स्थिरता आणि सामूहिक प्रगतीसाठी महाराष्ट्र चेंबर्स चे कार्य महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी प्रतिपादन केले
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि अ‍ॅग्रिकल्चर (MACCIA) आणि कोटक लाईफ ( Kotak Life) यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती बिझनेस प्रोटेक्शन समिट २०२५ शुक्रवार दि. २६ सप्टेंबर रोजी संपन्न झाला.
या प्रसंगी कार्यकारी अभियंता विजय पेटकर,कोटक लाईफ चे प्रादेशिक प्रमुख, सवीन डोले, रिजीनल मॅनेजर निखिल पासरे व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि अ‍ॅग्रिकल्चर चे विभागीय चेअरमन शरद सूर्यवंशी
व शिवाजी निंबाळकर, सुशीलकुमार सोमाणी, जगदीश पंजाबी, पी.टी. गांधी, सुरेश पारकळे, मनोज तुपे,विलास अडके, महेश ओसवाल, संभाजी माने, भारत जाधव, संभाजी किर्वे, विकास देशपांडे, शब्बीर शेख यासह बारामतीतील उद्योजक आणि व्यापारी उपस्थित होते.
सदर उपक्रमाचे कौतुकास्पद असून उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी चेंबर्स ने घेतलेल्या पुढाकाराचे समाधान व्यक्त करून व्यवसायिक वातावरण मजबूत करण्यासाठी या प्रकारच्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचे हनुमंत पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाद्वारे बारामतीतील उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी ठोस उपक्रम राबवण्याचे उद्दिष्ट व्यक्त केले. तसेच, यापुढील काळात अशा प्रकारच्या समिट्समुळे स्थानिक उद्योगधंद्याचा विकास होईल आणि व्यवसायिक वातावरण अधिक सुरक्षित व समर्थ होण्यासाठी चेंबर्स अनेक कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे चेअरमन शरद सूर्यवंशी यांनी सांगितले.
या वेळी कोटक लाईफ च्या वतीने आर्थिक नियोजन व उद्योजक, व्यवसायिक,व्यापारी यांच्या साठी असलेल्या विविध योजनांची माहिती सांगितली.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!