
सई कदम हिचा सत्कार करताना श्रीमंत शिवांजलीराजे व श्रीमंत संजीवराजे,दीपकराव चव्हाण,बाळासाहेब शेंडे व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २९ सप्टेंबर २०२५):- फलटण येथील श्रीमंत सईबाई महाराज महिला सहकारी पतसंस्था च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर, फलटण येथील इयत्ता चौथीत शिकणारी सई निर्मला मनोज कदम हिचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विविध शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल तिचा गुणगौरव महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी सातारा जिल्हा परिषदे चे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमंत शिवंजलीराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
कु सईच्या यशात तिच्या कष्टांबरोबरच पालकांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे प्रोत्साहन आणि शाळेचे योगदान मोठे आहे. तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळून तेही मोठी स्वप्ने पाहतील आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपडतील. कु सई हिच्या या यशामुळे पालकांचे व फलटण एज्युकेशन सोसायटीचे नाव उज्ज्वल झाले असून तिच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी आम्ही सर्वजण तिला मनःपूर्वक शुभेच्छा देतो असे यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी शुभेच्छा पर भाषणात सांगितले व तिचे कौतुक केले .
या प्रसंगी माजी आमदार दीपक चव्हाण श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे व इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



