
फलटण टुडे वृत्तसेवा सातारा दि. ३० सप्टेंबर २०२५):- राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर व शिक्षक निवडणुक मतदार संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करणेसाठी कार्यक्रम घोषित करण्यास आला आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी दरवेळी नव्याने मतदार नोंदणी होत असते. गतवेळची यादी रद्दबातल होत असते. यासाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणी करावी, असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
1 नोव्हेंबर 2025 रोजी या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर व शिक्षक निवडणूक मतदार संघांच्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमाचे टप्पे पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आले आहेत. मतदार नोंदणी अधिनियम १९६० चे कलम ३१(३) अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक मंगळवार ३० सप्टेंबर २०२५ रोजी, मतदार नोदणी अधिनियम १९६० चे कलम ३१ (४) अन्वये वर्तमान पत्रातील नोटीसीची प्रथम पुनर्प्रसिद्धी बुधवार दि. १५ आक्टोंबर २०२५ रोजी, मतदार नोदणी अधिनियम १९६० चे कलम ३१(४) अन्वये वर्तमान पत्रातील नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिद्धी शनिवार दि २५ ऑक्टोवर २०२५ रोजी, प्रकरणपरत्वे नमुना १८ किवा १९ द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक गुरुवार ६ नोव्हेंबर २०२५ रोजी, हस्तलिखिते तयार करणे व प्रारूप मतदार याद्याची छपाई गुरुवार दि.२० नोव्हेंबर २०२५ रोजी, प्रारूप मतदार याद्याची प्रसिद्धी मंगळवार दि.२५ नोव्हेबर २०२५ रोजी, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी (मतदार नोदणी अधिनियम १९६० चे कलम १२ अंतर्गत) मंगळवार दि.२५ नोव्हेंबर २०२५ ते. बुधवार दि. १० डिसेंबर २०२५ रोजी अखेर, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे गुरुवार दि.२५ डिसेबर २०२५ रोजी, मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी मंगळवार दि. 30 डिसेंबर 2025 रोजी असा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी गतवेळी सातारा जिल्ह्यात 11 तालुक्यात असून 7 हजार 711 मतदारांसाठी 44 केंद्रे होती. तर पदवीधर मतदारसंघासाठी 59 हजार 71 मतदारांसाठी 123 केंद्रे होती. शिक्षक पदवीधर मतदार संघासाठी नियमित शिक्षक असणे आवश्यक असून पदवीधर मतदार संघासाठी कोणत्याही विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. यामध्ये मतदार नोंदणीसाठी गठ्ठ्याने अर्ज सादर करता येणार नाहीत. कुटूंबस्तरावर अर्ज सादर करता येतील.
पुणे पदवीधर व शिक्षक निवडणूक मतदार संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करण्याकरिता विभागीय आयुक्त पुणे हे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कामकाज पाहणार असून सातारा जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी सातारा हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. सातारा जिल्ह्यांतर्गत असणाऱ्या ८ मतदार संघाकरिता उपविभागीय अधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. सातारा जिल्ह्यातील ११ तालुकेअंतर्गत एकूण ४६ तहसीलदार, गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार, मुख्याधिकारी हे एकूण १२३ मतदान केंद्रावर पदनिर्देशित अधिकारी म्हणून कामकाज पाहणार असून ते नोंदणी फॉर्म स्विकृतीचे कामकाज करतील.
पुणे पदवीधर व शिक्षक निवडणूक मतदार संघाच्या मतदार याद्यांच्या अनुषंगाने पदवीधर मतदार संघाकरिता नाव समाविष्ट करणेसाठी नमुना १८ व शिक्षक गतदार संघाकरिता नाव समाविष्ट करणेसाठी नमुना १९ हा फॉर्म वापरायचा असून त्यामधील आधार क्रमांक नमूद करणे ऐछिक आहे. ऑफलाइन फॉर्म नोंदणी करीता तहसील कार्यालय येथे व ऑनलाइन पध्दतीने फॉर्म डाऊनलोड करणेकरीता मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे ceoelection.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

