शनिनगर नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गामातेची भव्य विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते

फलटण टुडे वृत्तसेवा( फलटण दि ३० सप्टेंबर २०२५):- शनिनगर नवरात्रोत्सव मंडळाच्या (योद्धा ग्रुप) दुर्गामातेची भव्य दिव्य विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ गुरुवार, दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं.०६ वाजता महाराष्ट्र विधान परिषद मा.सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रोहित शिंदे यांनी दिली. फुलांनी सजवलेल्या रथामध्ये दुर्गा मातेच्या मुर्तीची विसर्जन मिरवणूक निघणार असून त्याप्रसंगी भागातील युवक, युवती, महिला बहुसंख्यने उपस्थित राहणार आहेत. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पै.अभिजीत जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाची यशस्वी वाटचाल सुरु आहे, दुर्गामाता मिरवणूक शुभारंभ प्रसंगी मा.नगरसेवक किशोरसिंह नानासाहेब नाईक निंबाळकर (भैय्या), मा.नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे, उद्योजक सत्यजीत घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, दरम्यान मंडळाला पंधरा वर्षे पूर्ण झाले असून मंडळाने पारंपारिक नागपंचमी उत्सवाची परंपरा राबवून फलटणकरांची मने जिंकलेली आहेत, तसेच अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबाना मदत, त्याचबरोबर महिलांसाठी गरबा, दांडिया, विविध धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येतात.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!