
फलटण टुडे वृत्तीच (फलटण, दि. ३० सप्टेंबर २०२५) : – फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सी बी एस ई विभाग ) जाधववाडी , फलटण येथे ‘द ग्रँड दांडीया अँड गरबा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ६१ व्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्त साधून फलटण शहरातील महिला आणि युवतींसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
या ‘द ग्रँड दांडीया अँड गरबा’ कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता जाधववाडी येथील श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम स्कूल सी बी एस ई विभाग येथे होणार आहे.
या कार्यक्रमासाठी फलटण शहरातील महिलां व युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने मा. प्राचार्या सौ मिनल दिक्षीत यांनी केले आहे.



