इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडील योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि.३० सप्टेंबर २०२५ ): राज्यातील इतर मागास प्रवर्गाच्या सर्वांगिण कल्याणासाठी कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत विविध इतर मागास प्रवार्गातील कार्यरत 13 उपकंपन्या शासनाने स्थापन केल्या असून सातारा जिल्हास्तरावरील कामकाज कार्यन्वित करण्यात आले आहे , अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक पी.एन.दळवी यांनी दिली.

सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी महामंडळ व महामंडळाच्या उपकंपन्यांमार्फत रु. 1लाख रकमेची बिनव्याजी थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार इतर मागास प्रवर्गातील, अर्जदाराचे व 18 ते 55 वर्षे या दरम्यान, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1 लाख रुपये असणे आवश्यक असून अर्जदाराचा सिबिल स्कोर किमान 500 असणे आवश्यक आहे. 
याबाबत अधिक माहितीकरिता जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी बिंग, दुसरा माळा, खोली नं. 3, सर्व्हे नं. 22/अ, जुना एम.आय.डी.सी. रोड, बॉम्बे रेस्टॉरन्ट उड्डाण पूलाजवळ, सातारा-415003. दूरध्वनी क्र. 02162-295184 या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक पी.एन.दळवी यांनी केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!