
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. १ ऑक्टोबर २०२५ ):-
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर ठाकूरकी, फलटण येथे डी फार्मसी व बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त दिनांक ८ऑक्टोंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे उद्घाटन डॉ.ए. व्ही. यादव सर, प्राचार्य, कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी कराड यांचे शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रम देशमुख यांनी दिली.
सदर स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून शिल्पा मेडिकेअर रायचूर, कर्नाटक या कंपनीचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट श्री सुनील करपे तसेच विविध फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित राहणार असून या स्पर्धेसाठी राज्यातील सातारा,सांगली कोल्हापूर, सोलापूर, पुणे,मुंबई, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यातील सुमारे ५५ फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत आपला सहभाग नोंदवला आहे.
ही स्पर्धा डिप्लोमा व डिग्री फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी असून प्रत्येकी तीन विजेत्यांची निवड केली जाणार आहे आधुनिक फार्मसी क्षेत्रात ग्रामीण भागातील फार्मासिस्ट विद्यार्थी कसा यशस्वी होऊ शकतो याचे मार्गदर्शन तसेच विविध फार्मसी विषयांच्या फार्मसी विषयांच्या पोस्टरचे सादरीकरण महाराष्ट्रातील विविध विद्यार्थी करतील.

स्पर्धेच्या आयोजनाचा मूळ हेतू हा विद्यार्थ्यांचा संशोधनात्मक दृष्टिकोन वाढीस लागणे तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा औषध निर्माण क्षेत्रातील उपयोग औषध निर्माण व औषध विक्रीचे व्यवसाय सध्याच्या स्पर्धात्मक युगात कसे यशस्वी होतील यासंदर्भातील मार्गदर्शन व विद्यार्थ्यांनी आधुनिकतेची कास धरण्यासाठी एक अत्याधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे सदर स्पर्धेच्या माध्यमातून सक्षम फार्मासिस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न आहे .
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महाविद्यालय विकास समिती सदस्य, महाविद्यालय नियामक मंडळ सदस्य, प्रशासन अधिकारी प्राचार्य श्री अरविंद निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद विद्यार्थी यांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



