ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या आर्थिक लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि.3) :  शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनांमध्ये प्रवेश घेणाऱ्या व वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लाभ २६ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक डॉ. कांचन जगताप यांनी केले आहे.

 योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारे व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपेक्षा कमी असणारे विद्यार्थी पात्र आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्ष रुपये ४३ हजार व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रूपये ३८ हजार या प्रमाणे लाभाचे वितरण केले जाणार आहे. सदर योजनेंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या १०५ विद्यार्थ्यांची लाभाकरीता निवड केली जाणार आहे.

 बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) शिक्षण घेणाऱ्या प्रथम, वर्षातील विद्यार्थ्यांना दिनांक 2६ ऑक्टोबर पर्यंत https://hmas.mahait.org  या ऑनलाईन पोर्टलवर प्रवेश अर्ज करावेत. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सातारा यांचे कार्यालयात जमा करावी. 

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!