श्रद्धांजली साठी अनोख्या उपक्रमाची चर्चा

फलटण टुडे वृत्तसेवा (जळोची दि ०८ ऑक्टोबर २०२५):-
गोजुबावी येथे श्री गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने स्वर्गीय सहकाऱ्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ “होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते
वृषालीताई येतकाळे प्रथम,रुपाली सावंत उपविजेत्या व
वैशालीताई जाधव, सविताताई सावंत, आणि कीर्तीताई कांबळे यांनी अनुक्रमे तृतीय, चतुर्थ आणि पाचवा क्रमांक मिळवला.
आपल्या सहकार्यांना व पूर्वजांना आणि त्यांच्या कार्यांना विसरता कामा नये हा संदेश देण्यासाठी व कैलासवासी सदस्यांच्या स्मृतींना अभिवादन आणि ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना वाव देणे साठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे तुषार गटकळ यांनी सांगितले.

शेखर होळकर, भगवान कदम, सुहास आटोळे, आप्पासाहेब गाढवे, विकास कुंभार, संतोष सावंत, राहुल मोकाशी, चंद्रकांत राऊत, महेंद्र होळकर, आनंदराव कदम, न्याजुद्दीन शेख, आई अलका (बाई) गटकळ व वर्षाराणी गटकळ व
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, महादेव गायकवाड, डॉ. दिनेश हंचाटे, सरपंच प्रतीक्षा सचिन भोसले, उपसरपंच हिराबाई बद्रीनाथ जाधव, नारायण जाधव, नितीन गटकळ, विकास आटोळे, अशोक आटोळे, काका आटोळे, सचिन जाधव, रुपाली सावंत, आणि वंदना कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात चूल आणि मूल या पलीकडे जाऊन समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाल्याबद्दल उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले.


